शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

उघाड मिळताच आंतरमशागतीला वेग

By admin | Updated: July 14, 2016 02:13 IST

आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत होते.

शेतीकामांची लगबग : ३ लाख ५५ हजार ९१६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी वर्धा : आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत होते. हा या हंगामातील पहिलाच दमदार पाऊस असल्याने पिकांच्या वाढीसाठी तो पोषकच आहे. पण पाऊस थांबतच नसलेल्या शेतकरी वर्गाला आंतरमशागतीचा प्रश्न सतावत होता. कालपासून काहीशी उघाड मिळताच आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यातील जवळपास ९० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत होते. पुनर्वसू नक्षत्राच्या प्रारंभीच जिल्ह्यासह राज्यभरात दामदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर आदी खरीपातील पिके अंकुरली. विशेष म्हणजे दुबार पेरणीचे संकट या पावसाने टळले. पण आठवडाभरापासून ठाण मांडलेला पाऊस उघाड केव्हा देतो याची वाट शेतकरी बघत होते. अतीपावसामुळेही साधलेली पिके नष्ट होण्याचीही भीती शेतकऱ्यांना होती. पण मंगळवारपासून पावसाने काहीशी उघाड दिली. त्यामुळे लगोलग शेतकरी आंतरमशागतीच्या कामांत गुंतला आहे. यामध्ये डवरणी, फवारणी, निंदन, खत टाकणे यासह इतरही कामांना वेग आला आहे. काही दिवस उघाड देऊन पाऊस यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. यासाठी गावागावांत मजूरवर्गाचा शोध सुरू आहे. तसेच फवारणीची औषधे व खतांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे.(शहर प्रतिनिधी) पिकांच्या फवारणीलाही आला वेग पिकांचे किटकांपासून रक्षण व्हावे, यासाठी फवारणी केली जाते. पाऊस थांबताच फवारणीला वेग आला आहे. आधीच अत्यल्प उत्पन्नामुळे गतवर्षी शेतकरी मेटाकुटीस आला होता. त्यामुळे यंदा त्यांना कुठलीही जोखीम घ्यावयाची नाही. त्यामुळे फवारणी सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक पंपांमुळे आता फवारणी पूर्वीपेक्षा काहीशी सोपी झाली आहे. बरेच शेतकरीच आता स्वत:च्या शेतात फवारणी करून घेत आहेत.