शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अभिनव धूलिवंदनाचा समारोप

By admin | Updated: March 8, 2015 01:49 IST

सुरगाव गावाने १८ वर्षांची परंपरा सांभाळत अभिनव धुलिवंदन आणि संतविचार ज्ञानयज्ञ ४, ५, व ६ मार्च असा सलग तीन दिवस राबविला.

सेलू : सुरगाव गावाने १८ वर्षांची परंपरा सांभाळत अभिनव धुलिवंदन आणि संतविचार ज्ञानयज्ञ ४, ५, व ६ मार्च असा सलग तीन दिवस राबविला. या तीन दिवसात विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम उपस्थितांसाठी पर्वणी ठरले. धुलिवंदनाच्या दिवशी शुक्रवारी याचा समारोप कार्यक्रम झाला. गावातील तसेच इतर जिल्ह्यातील व पंचक्रोशीतून आलेल्या लोकांनी या रंगाविणा आदर्श धुळवडीला डोक्यात साठवून घेतले. सकाळी आरशा सारख्या स्वच्छ रस्त्यावरून सडामार्जन व रांगोळी घातलेल्या अंगणात राष्ट्रसंताचे व इतर संताचे दारात आसनावर सजविलेले फोटो त्यापुढे लावलेला शांत नंदादीप व अगरबत्तीचा सुगंध वातावरणात प्रसन्नता आणून गेला. डोक्यावर भगव्या टोप्या घातलेले लहान थोर, महिला यांचा समावेश असलेली नामधून (प्रभातफेरी) राष्ट्रसंताचा गजर करीत गावभर फिरून झाल्यावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सप्तखंजेरीवादक इंजिनिअर भाऊसाहेब थुटे होते. पाहुणे म्हणून ठाणेदार संतोष बाकल, समाजसेवक सुनील बुरांडे, मोहन अग्रवाल आदींसह आदिवासी नेते अवचित सयाम, भास्कर वाळके, रवी खडतकर, अनिल चौधरी, बा.दे. हांडे, बा. या. वागदरकर, सुरेश मांडळे, जर्नादनपंत ठाकरे, बुरांडे, सुरेश वानखेडे, शेख मेहबुब, किशोर करंदे, उकेश चंदनखेडे, धर्मेश झाडे, मारोती साव, अहिल्याबाई पुरस्कार प्राप्त सुमन चांदेकर(चंद्रपूर), कविता येनूरकर (सेवाग्राम), मेश्राम गुरूजी (खंबाळा), यांच्यासह विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मान्यवरांची उपस्थिती होती.प्रास्ताविक मुख्य आयोजक प्रवीण महाराज देशमुख यांनी केले. आयोजनामागील भूमिका व १८ वर्षांच्या निरंतर प्रवासाचा उल्लेख त्यांनी केला. याप्रसंगी मोहन अग्रवाल, अनिल चौधरी, अवचित समयार, धर्मेश झाडे यांनी मनोगत व्यक्त केले.