शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षा कायद्यावर माहिती

By admin | Updated: June 18, 2014 00:21 IST

समाजातील प्रत्येक स्तरातील घटकांला अन्न धान्य मिळावे, कुणीही अन्नावाचून राहू नये. या उद्देशाने शासनाने सुरु केलेली ‘अन्न सुरक्षा योजना’ ही केवळ योजना नसून कायदा आहे.

कारंजा(घा.) : समाजातील प्रत्येक स्तरातील घटकांला अन्न धान्य मिळावे, कुणीही अन्नावाचून राहू नये. या उद्देशाने शासनाने सुरु केलेली ‘अन्न सुरक्षा योजना’ ही केवळ योजना नसून कायदा आहे. म्हणून या योजनेंतर्गत अन्नधान्य वाटप काटेकोरपणे व विना विलंब झाले पाहिजे, असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांनी व्यक्त केले. कारंजा तालुक्यातील स्वस्त धान्य विक्रेत्यांसाठी सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सभेला तहसीलदार बालपांडे व तालुक्यातील स्वस्त धान्य विक्रेते, विभाग प्रमुख सचिन गवळी उपस्थित होते. या जून महिन्यात एपीएल धारकांना ९.६० रुपये दराने ४ किलो तांदूळ व ७.२० रुपये दराने ७ किलो गहू, वाटप करण्यात येत असल्याची माहिती पुरवठा विभाग प्रमुख सचिन गवळी यांनी दिली. तसेच १० तारखेच्या आत माल उचलून त्वरीत वितरित करण्याचा सल्ला दिला. तसेच असे करीत नसलेल्या स्वस्त धान्य विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.कारंजा तालुक्यात ‘अन्नपूर्णा’ योजनेचे १५५ कार्ड धारक असून त्यांना प्रतिकार्ड १० किलो धान्य विनामुल्य दिले जाईल. तसेच अंत्योदय योजनेचे, तालुक्यात ४ हजार ७५८ कार्ड धारक असून प्रत्येक कार्डधारकाला ३५ किलो धान्य वितरीत केले जाईल. ४४ हजार रुपयाच्या दरम्यान उत्पन्न असणाऱ्या कार्डधारकांना प्रती माणसी ५ किलो धान्य मिळत आहे. धान्य सुरळीत मिळत नसल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी, तहसील कार्यालयाला केली आहे. त्याची चौकशी करुन त्वरीत योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदाराने यावेळी दिली. काही स्वस्त धान्य दुकानदार, आपल्या सोयीनुसार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उशिरा धान्याची उचल करतात व योग्य पुरवठा करीत नाही. म्हणून अनेकांना त्याच्या हिस्याचा कोटा मिळत नाही. असा गैरव्यवहार आढळल्यास ग्राहकांनी लेखी तक्रार संबंधित विभागाला करावी अशी माहिती . म्हणजे त्वरीत कारवाई करता येईल, असे आश्वासन जिल्हा पूरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी जनतेला दिले. यावेळी परिसरातील स्वस्त धान्य विक्रेत्यांची उपस्थिती होती. त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)