शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कायम परवान्याची मर्यादा ६५ वर्षांपर्यंत वाढवा

By admin | Updated: July 11, 2016 02:01 IST

केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या तरतुदीप्रमाणे वाहन चालविण्याच्या कायम परवान्याची मर्यादा ५० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

जनमंचची मागणी : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री व प्रशासनाला साकडेरोहणा : केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या तरतुदीप्रमाणे वाहन चालविण्याच्या कायम परवान्याची मर्यादा ५० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यामुळे ५० वर्षानंतर वाहन परवान्याची मुदत दर पाच वर्षांनी वाढविण्यासाठी वाहन चालकाला परिवहन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. उतार वयात चकरा मारणे सर्वांना अवघड होते. यामुळे कायम परवान्याची मर्यादा ६५ वर्षे करावी, अशी मागणी जनमंचने केली आहे. काही वर्षांपूर्वी जनमंचने एका आरटीओ अधिकाऱ्याची प्रकरणे उघड केली होती. त्या अधिकाऱ्याने एका दिवसात सर्वप्रकारचे दोन हजार परवाने वितरीत करण्याचा पराक्रम केला होता. सदर प्रकरण न्यायालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली होती. शासनाने वाहन परवान्याचे नुतनीकरण ५० वर्षांनंतर करण्याचा नियम केला; पण या नियमाचा जनतेची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी उपयोग होत आहे. आजच्या प्रचलित व्यवस्थेत सर्वांच्याच वाहन परवान्याचे पाच वर्षांसाठी नुतनीकरण करून मिळते. एखाद्या व्यक्तीला वाहन चालविणे शक्य नसल्यास तो वाहन चालविणारच नाही. यासाठीच पाच वर्षांनंतर नुतनीकरण करण्याचा नियम शिथील करणे काळाची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे माणसाच्या जीवन जगण्याच्या कालमर्यादेत वाढ झाली आहे. अनेक शासकीय कार्यालयांत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे ६५ वर्षांपर्यंत वाढविण्यात आले आहे. कायम परवान्याची कालमर्यादा वाढविल्यास आरटीओ कार्यालयातील कामाचा बोझा कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मनुष्यबळाच्या कमतरतेची ओरड कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत जनमंचद्वारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले आहे. जनमंचच्या निवेदनाची दखल घेत याबाबत संबंधितांना पत्र पाठविण्यात आले आहे. जनतेचा पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी वाहन परवान्याची कालमर्यादा ६५ वर्षांपर्यंत करण्याची मागणी नागपूर जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे, आर्वी तालुका जनमंचचे फनिंद्र रघाटाटे, प्रकाश टाकळे, बाळासाहेब गलाट, हितेंद्र बोबडे, सुनील वाघ, दिलीप पांडे, मधुकर नायसे, दादासाहेब हिवसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे.(वार्ताहर)