शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

तलाव तेथे मासोळी अभियानातून अर्थाेत्पादनात वाढ करा

By admin | Updated: June 4, 2017 01:00 IST

पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात तलाव आहे. या तलावांचा पाहिजे त्या प्रमाणात अद्याप उपयोग घेण्यात आला नाही.

अनुप कुमार : लाल नाला येथे मोहिमेचा शुभारंभ; राज्यातील ३६ टक्के मत्स्योत्पादन पूर्व विदर्भातून लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात तलाव आहे. या तलावांचा पाहिजे त्या प्रमाणात अद्याप उपयोग घेण्यात आला नाही. पूर्व विदर्भातील ४ लाख ७० हजार लोकांची उपजीविका मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी मासेमारी करणाऱ्या ढिवर बांधवांसह शेतकऱ्यांनी तलाव तेथे मासोळी अभियानात सहभागी होत अर्थाेत्पादनात वाढ करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले.समुद्रपूर येथील लाल नाला प्रकल्पस्थळी तलाव तेथे मासोळी अभियानाचा शुभारंभ अनुप कुमार यांनी केला. यावेळी ते बोलत होते. जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे उपायुक्त समीर परवेज, उपविभागीय अधिकारी समाधान शेंडे उपस्थित होते. अनुप कुमार पुढे म्हणाले की, या अभियानाचे स्वप्न मागील तीन वर्षांपासून बघत होतो. त्याची आज सुरुवात झाली आहे. ढिवर समाज बांधव पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतो; पण त्याच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसत नाही. राज्याचे ३६ टक्के मत्स्योत्पादन पूर्व विदर्भातून होते. एवढी मोठी उत्पादन क्षमता असताना गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाकडे दुर्लक्ष झाले आहे. पारंपरिक पद्धतीतून मत्स्योत्पादन कमी होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असल्याशिवाय उत्पन्नात वाढ होणार नाही. लोकअभियान म्हणून तलाव तेथे मासोळी हे अभियान पूढे आले पाहिजे. जलयुक्त शिवार अभियानात ५० कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वी होत आहे, त्याचप्रमाणे हे अभियानही यशस्वी होईल. पूर्व विदर्भात मत्स्य विकासाच्या दृष्टीने २०२२ चा आराखडा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांना तयार करण्यास सांगितले आहे. या अभियानासाठी अनुकूल तलावांची निवड करून जूनमध्ये मत्स्य संवर्धनाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मत्स्य विकास हा केवळ उत्पन्नात वाढ व उपजिविकेचे साधन नाही. मास्यांमध्ये प्रथिनांचा मोठा स्त्रोत असल्याने त्याचा उपयोग शरीराच्या वाढीसाठी होईल. मासे खाण्यामुळे मेंदू विकासास चालना मिळते. सर्वाधिक प्रथिने मास्यांमध्ये आहे. अन्न साखळीमध्ये प्रथिनाला महत्त्व आहे. आश्रमशाळांतूनही मुलांना आहारात मासे द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.आ. कुणावार यांनी या अभियानामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना जोडधंद्याची गरज आहे. योजना हा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे. या योजनेतून मागेल त्याला शेततळे प्रमाणे मागेल त्याला मत्स्य बोटुकली द्यावे. मत्स्योत्पादनासाठी तलावांचा लिलाव होतो, त्याचा फायदा जिल्ह्याबाहेरील लोक घेतात. या योजनेचा फायदा स्थानिक ढिवर समाजाला देण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असे सांगितले.