शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार उमेदवारांच्या नोंदणीसाठी आता सुधारित वेबपोर्टल

By admin | Updated: January 19, 2017 00:40 IST

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत बेरोजगार उमेदवार आणि रोजगार पुरविणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यासाठी

वर्धा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत बेरोजगार उमेदवार आणि रोजगार पुरविणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यासाठी वेबपोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. यात सुधारणा करण्यात आल्या असून नवीन वेबपोर्टल ४ जानेवारीपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. या वेबपोर्टलवर जुन्या महारोजगार वेबपोर्टलवरील उमेदवार व नियोक्ते आणि रिक्तपदे याबाबतची सर्व माहिती टाकण्यात आली आहे. नवीन वेबपोर्टलवरुन सर्व कामकाज करावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे संहायक संचालक एम.जी. घाटोळ यांनी केले आहे. याबाबत बैठक घेऊन त्यांनी सूचना केल्या. नवीन वेबपोर्टवर जुन्या महारोजगार वेबपोर्टलवरील युझर आयडी व पासवर्ड टाकल्यास नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये आधार क्रमांक अत्यावश्यक असून, आॅनलाईन पडताळणी करूनच पुढे जाता येईल. तसेच एकदा नोंदणी क्रमांक प्राप्त झाल्यावर धारक पासवर्ड विसरला असल्यास अथवा लॉगईन होत नसल्यास उमेदवारांना फॉरगॉट पासवर्ड ही सुविधा देण्यात आली आहे. नवीन उमेदवार व नियोक्ते नोंदणी, रिक्तपदे अधिसूचित करणे, उमेदवार व नियोक्ते नोंदणीचे अद्ययावतीकरण करणे यासर्व बाबी यापुढे नवीन वेबपोर्टलवर उपलब्ध राहणार आहे. सध्या महारोजगार वरून या सेवांसाठी नवीन प्रणालीकडे ते आपोआप वळते करण्यात येईल. नियोक्ते यांनी रिक्तपदे अधिसूचित करणे व त्याबाबतची पुढील आवश्यक सर्व कार्यवाही उमेदवारांची यादी डाऊनलोड करणे, उमेदवार शेड्यूल करणे व त्यांचा प्रोफाईल पाहणे, प्लेसमेंट भरणे इत्यादी कामे यापुढे या वेबपोर्टलवरून करावेत. नियोक्ते यांनी तिमाही व द्विवार्षिक विवरणपत्रे पुढील सूचना मिळेपर्यंत महारोजगार वेबपोर्टलवर पूर्वीच्याच लॉगईन आयडी व पासवर्ड वापरून भरावे, अशी माहिती देण्यात आली आहे. याबाबत उमेदवरांना अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातून मार्गदर्शन मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.(स्थानिक प्रतिनिधी)