शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

बालकाचे शोषण करणाऱ्यास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:51 IST

शारीरिकदृष्ट्या अशक्त असलेल्या दहा वर्षीय बालकाला चॉकलेटचे आमिष देऊन अनैसर्गिक कृत्य करणाºया आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्वाळा विशेष सत्र न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी दिला.

ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालयाचा निर्वाळा : पीडिताला ५० हजारांची नुकसान भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शारीरिकदृष्ट्या अशक्त असलेल्या दहा वर्षीय बालकाला चॉकलेटचे आमिष देऊन अनैसर्गिक कृत्य करणाºया आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्वाळा विशेष सत्र न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी दिला.मनोज सुरेश टेंभरे (२४) रा. दिग्रस, ता. सेलू असे आरोपीचे नाव आहे. पीडित बालक हा मित्रांसोबत मनोजच्या घराजवळ खेळत असताना त्याला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वत: च्या घरी नेत अनैसर्गिक कृत्य केले. वेदना असह्य झाल्याने पीडित बालक रडत घराबाहेर पडला. तेवढ्यात पीडिताचे वडील तेथे आले असता त्यांचा मुलगा त्यांना रडताना दिसला. त्यांनी मुलाला विचारणा केल्यावर त्यांने घडलेला प्रकार सांगितला.पीडिताचे वडील काही लोकांसह आरोपीच्या घरात शिरले असता आरोपीने मागील बाजूने पळ काढला. त्यामुळे पीडिताच्या वडिलांनी सरळ सिंदी (रेल्वे) पोलीस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार नोंदविली. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शेख व तपास अधिकारी दिगंबर गांजरे यांनी नागरिकांचे बयाण, वैद्यकीय तपासणी करून आरोपी मनोजविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यावर शासनातर्फे ९ साक्षीदार तपासून युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. तसेच पीडिताला शासनार्फे ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचाही आदेश देण्यात आला.या प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक अभियोक्ता अमोल कोटंबकर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून राजेंद्र तिवारी यांनी सहकार्य केले.