शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध प्रवासी वाहतूक ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2015 02:14 IST

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील असलेल्या या शहरात सर्रास अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष : काळी-पिवळी, आॅटोत कोंबतात प्रवासीकारंजा (घा.) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील असलेल्या या शहरात सर्रास अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. परिवहन महामंडळाच्या बसेस कमी असल्याने प्रवाश्यांनाही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याकडे पोलीस यंत्रणेसह सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याने ही वाहतूक प्रवाश्यांच्या जीवावर बेतताना दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. नागपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर नाही. वर्धा ते कारंजा तसेच अन्य मार्गावरही बसेस कमी असल्याने नागरिकांना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागतो. या वाहनांद्वारे सर्रास प्रवासी वाहतूक केली जात असून प्रवाश्यांना अक्षरश: कोंबले जाते. यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघात नित्याचेच झाले आहेत. यातच प्रवासी कोंबलेली वाहने चालकांना व्यवस्थित चालविणे शक्य होत नसल्याने तीही अपघातग्रस्त होतात. रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करून प्रवासी घेणे, रस्त्यात कुठेही ‘ब्रेक’ दाबून वाहने थांबविणे आणि प्रवाश्यांची चढ-उतार करणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. यामुळेच अपघाताची शक्यता बळावली आहे. अवैध प्रवासी वाहतुकीला जिल्ह्यात अधिकृत परवानगी असल्यागत ही वाहतूक होते. यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व पोलीस यंत्रणेच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)