शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गौणखनिज उत्खनन; महसूल पाण्यात

By admin | Updated: January 25, 2015 23:21 IST

महसूल प्राप्त करण्याचे मोठे साधन म्हणून गौण खनिजाकडे पाहिले जाते़ टेकड्या, जमिनीपासून उंच भागातून गौण खनिजाच्या उत्खननाकरिता पट्ट्यांचे वाटप केले जाते़ हे खाणपट्टी शासनाकडून

वर्धा : महसूल प्राप्त करण्याचे मोठे साधन म्हणून गौण खनिजाकडे पाहिले जाते़ टेकड्या, जमिनीपासून उंच भागातून गौण खनिजाच्या उत्खननाकरिता पट्ट्यांचे वाटप केले जाते़ हे खाणपट्टी शासनाकडून लीजवर दिले जात असून त्याचे ठराविक कालावधीत नुतनीकरण करावे लागते़ जिल्ह्यात कुणालाही न दिलेल्या जमिनीतूनच उत्खनन होत असल्याचे आढळून येत आहे़ यात चोरटे मालामाल होत असले तरी प्रशासनाला कोट्यवधींच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे़ वर्धा जिल्ह्यातील अनेक पठार भागात खदाणीला परवानगी देण्यात आली आहे़ यात केळझर, येळाकेळी, पुलगाव, गुंजखेडा, आगरगाव यासह हिंगणघाट, आर्वी, आष्टी, सेलू व वर्धा तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे़ खदाणीकरिता संबंधित गावांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळविणेही गरजेचे असते़ शिवाय पर्यावरण व भूजल विभागाची परवानगीही गरजेची असते; पण जिल्ह्यात कुठलीही परवानगी न घेता सर्रास गौण खनिजाचे उत्खनन केले जात असल्याचे आढळून येथे आहे़ गुंजखेडा ग्रा़पं़ हद्दीत येणाऱ्या वनविभागाच्या जमिनीवरून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी होत आहे़ याकडे महसूल प्रशासनासह वन विभागचेही दुर्लक्ष होत आहे़ असाच प्रकार आगरगाव शिवारातही होत आहे़ जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत जिल्ह्यातील गौण खनिज चोरी रोखणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)