शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

भाषा मृत पावली तर संस्कृतीही नष्ट होते

By admin | Updated: March 3, 2017 01:51 IST

प्रमाण भाषा ही तळ्यातल्या पाण्याप्रमाणे आहे तर बोली या झऱ्याप्रमाणे आहेत. बोली ही मराठी भाषेला शब्द पु

पुरूषोत्तम कालभूत : जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन वर्धा : प्रमाण भाषा ही तळ्यातल्या पाण्याप्रमाणे आहे तर बोली या झऱ्याप्रमाणे आहेत. बोली ही मराठी भाषेला शब्द पुरवून जिवंत ठेवतात; पण हल्ली बोलीच मृत पावत चालल्या आहेत. जाती-जमातीच्याही बोली नष्ट होताना दिसत आहेत. यामुळे आपण बोली जगविल्या पाहिजेत. बोली भाषा मृत पावल्या तर आपली संस्कृतीही नष्ट होते, असे मत लोकसाहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत यांनी केले.शिक्षा मंडळ वर्धाद्वारा संचालित श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयात सोमवारी मराठी विभागाद्वारे कवी कुसूमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार, मराठी विभाग प्रमुख डॉ. राजेश देशपांडे उपस्थित होते. डॉ. कालभूत पूढे म्हणाले की, अडीच हजार वर्षांपूर्वी मराठी भाषेचा उदय झाला. मराठी ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या काळात मराठीला सर्वोच्च वैभव प्राप्त झाले होते; पण आता कॉन्व्हेंट संस्कृती फोफावत असल्याने इंग्रजी भाषेचा वापर वाढला आहे. ज्याला इंग्रजी येत नाही, त्याला मागास समजले जाते. यामुळे मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. यामुळेच मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून द्यावयाचे असेल तर आपल्यापासून सुरूवात करा. मराठी बोला आणि बोली जगवा, असे आवाहनही त्यांनी केले.उपप्राचार्य सुरेश पवार यांनी आपली बोली भाषा बोलताना कोणतीही लाज बाळगू नका. सोबतच मराठी ही मातृभाषा आहे, हेही विसरू नका, असे सांगितले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ. राजेश देशपांडे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या आयोजना मागची भूमिका विषद केली. यावेळी दिलेश्वरी वर्मा व सारिका तेलगोटे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार प्रा. आनंद इंगोले यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रंथपाल डॉ. वैशाली उगले व विद्यार्थी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)