शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत पती-पती ठार

By admin | Updated: June 5, 2017 01:01 IST

येथील धाम नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत पती-पत्नी ठार झाले. ही घटना रविवारी दुपारी घडली.

पवनार येथील धाम नदीच्या पुलावरील घटना लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : येथील धाम नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत पती-पत्नी ठार झाले. ही घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत ठार झालेले दाम्पत्य महाबळा येथील असून विनोद पाटील व कल्पना पाटील अशी त्यांची नावे असल्याची माहिती आहे. पोलीस सुत्रानुसार, महाबळा येथील विनोद पाटील (५०) व त्यांची पत्नी कल्पला हे दोघे एमएच ३२ एल ५५८७ ने महाबळा येथे जात होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला. दोघांना धडक देवून अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळाहून पळ काढला. अपघातची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळ गाठत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या अपघातातील मृतदेह रस्त्यावर छिन्नविछिन्न अवस्थेत पडून असल्याने दुतर्फा वाहतूक खोळंबली होती. यावेळी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह उचलत वाहनात टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविले. या कामाकरिता त्यांना येथून प्रवास करणाऱ्या सचीन भिसे आणि सुरज पांडे नामक युवकांनी मदत केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. धडक देणाऱ्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. रानडुकराची धडक; एक ठार लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : वडनेर येथे दुचाकीने जात असलेल्या इसमाला रानडुकराने धडक दिली. यात सेलू तालुक्यातील बाभुळगाव येथील प्रमोद लाडवे (५९) यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सकाळी घडली. बेबी लाडवे (३७) व मुलगी सायली लाडवे (१७) अशी जखमींची नावे आहेत. प्रमोद लाडवे हे एमएच ३१ बीएक्स ३८९८ क्रमांकाच्या दुचाकीने अल्लीपूर मार्गे वडनेर येथे जात होते. दरम्यान पवनी शिवारात रानडुकराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात तिघेही पडल्याने प्रमोद यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांनी पत्नी बेबी व मुलगी सायली जखमी झाले. त्यांना अल्लीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने परिचारीकेकडून त्यांच्यावर उपचार करावा लागला.