शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शंभर टक्के हागणदारीमुक्त गाव करून लय भारी स्टिकरच घेणार

By admin | Updated: September 17, 2016 02:25 IST

हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी गावागावात गृहभेटी करून जनजागृती सुरू आहे. यासाठी शाळकरी लहान मुलांना

गटविकास अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : माणिकवाडा विद्यालयातील चिमुकल्यांनी व्यक्त केला निर्धारआष्टी (शहीद): हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी गावागावात गृहभेटी करून जनजागृती सुरू आहे. यासाठी शाळकरी लहान मुलांना शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळेच चिमुकल्यांनी माणिकवाडा गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करून लय भारी स्टिकर घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. माणिकवाडा गावात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या ७० टक्के होती. गावात बोटावर मोजण्याइतके शौचालय होते. शासनाची अनुदान योजना असतानाही गावकरी बांधकामास नकार देत होते. यावर उपाय म्हणून पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिल गावंडे यांनी गावाला वारंवार भेट देवून गावकऱ्यांना विश्वासात घेवून त्याचे महत्त्व पटवून दिले. कुटुंबप्रमुखाला आग्रही करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थी व शाळकरी चिमुकल्यांना जबाबदारी देण्यात आली. त्यासाठी गावंडे यांनी जिल्हा स्तरावरील पथकाला विद्यालयात नेले. जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यपालन अधिकारी शालीक मेश्राम, विस्तार अधिकारी कैलास वानखेडे, विस्तार अधिकारी पी.एस. चव्हाण, जिल्हा समन्वयक सचिन खाडे, पंचायत समिती सभापती अर्चना राहाटे, सरपंच तारा खवशे यांच्या उपस्थितीत माणिकवाडा विद्यालयातील विद्यार्थ्यांना शपथ घेवून शौचालय बांधकामाला सुरुवात करणार असल्याचे ठरविले. विशेष म्हणजे अपंग कुटुंंबप्रमुख शौचालयाची गरज असताना बांधकामास नकार देत होते. त्यांच्या घरी गटविकास अधिकारी अनिल गावंडे यांनी भेट देवून मतपरिवर्तन केले. यानंतर सहाही घरी बांधकाम सुरू करण्यात आले आहे. माणिकवाडा गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचा मानस गावंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे. शौचालय बांधकाम करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला १२ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी घरोघरी दैनंदिन आढावा घेण्याचे काम सुरू आहे. ग्रामसेवक प्रियंका राऊत यांनीही तात्काळ शौचालय बांधकाम अनुदान देणे सुरू केले आहे. सद्यस्थितीत आष्टी तालुक्यातील एकूण ३३ गावे हागणदारीमुक्त झाली आहे. उर्वरीत आठ गावे सुध्दा लवकरच मुक्त होण्यासाठी बिडीओ गावंडे गावागावात सभा घेवूना गृहभेटी देत आहेत. त्यांच्या उपक्रमाला गावकऱ्यांची साथ मिळत आहे.(तालुका प्रतिनिधी)