शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

मानवी नैतिक मूल्यांची पेरणी स्काऊटच्या माध्यमातून

By admin | Updated: December 21, 2014 23:04 IST

माणूस दिसायला खूप सुंदर असतो, शरीराचे सौंदर्य ही निसर्गमय देणगी आहे; पण गुणवत्तेत सौंदर्य मिळविण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते़ गुणवत्तेचे सौंदर्य आपल्यापासून कुणीच

पुलगाव : माणूस दिसायला खूप सुंदर असतो, शरीराचे सौंदर्य ही निसर्गमय देणगी आहे; पण गुणवत्तेत सौंदर्य मिळविण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते़ गुणवत्तेचे सौंदर्य आपल्यापासून कुणीच हिरावू शकत नाही़ विद्यार्थी जगात नैतिक मूल्यांची पेरणी करून गुणवत्ता प्रदान करण्याचे काम लॉर्ड बेडन पॉवेल यांनी स्काऊट गाईडसच्या माध्यमातून केले, असे मत माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केले़ हिवरा येथे तीन दिवसीय जिल्हा स्काऊट गाईड मेळावा पार पडला़ मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यस्थानाहुन ते बोलत होते़ हिवरा येथील इंडीयन मिलीटरी स्कूलच्या प्रांगणात वर्धा जिल्हा स्काऊट गाईडचा ३१ वा मेळावा पार पडला़ लॉर्ड बेडन पॉवेल तसेच माता सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन होऊन मेळाव्याचे उद्घाटन जि़प़ अध्यक्ष चित्रा रणनवरे यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके तर अतिथी म्हणून जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, इंडीयन मिलीटरी स्कूलचे अध्यक्ष मनोज भेंडे, सचिव कृष्णा कडू, स्काऊटचे राज्य आयुक्त व्ही.एस. काळे, जि.प. सदस्य राणा रणनवरे उपस्थित होते़ जिल्ह्यातील २०० शाळांतील ११०० स्काऊट गाईडसचा मेळाव्यात सहभाग होता़ यात शेकोटी सांस्कृतिक कार्यक्रमात नगराध्यक्ष मनीष साहू, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाळ नारलवार उपस्थित होते. साहसखेळ प्रसंगी प्रा. शैलेजा सुदामे अतिथी म्हणून उपस्थित होत्या़ मेळाव्यात सहभागी स्काऊट वीरबालसह ध्वज, बॅँड पथकाच्या निनादात शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी पं.स. सदस्य मंगला इंगळे, सरपंच वहिदा शेख, सिस्टर विद्या जोसेफ अतिथी म्हणून उपस्थित होते. स्काऊटचे जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. शिरीष गोडे यांच्या मार्गदर्शनात इंडीयन मिलीटरी स्कूलचे प्राचार्य रविकिरण भोजने यांच्या सहकार्याने अत्यंत नियोजनबद्धरीत्या झालेल्या जिल्हा मेळाव्यास जिल्हा प्रमुख सतीश राऊत, जिल्हा आयुक्त चंद्रकांत वाढई, प्रकाश डाखोळे, वैशाली अवथळे, पर्यवेक्षक नितीन कोहे उपस्थित होते़ समारोप खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेत दारूगोळा भांडारचे बिगेडीयर ए.एच. शान, संस्थाध्यक्ष मनोज भेंडे, सचिव कृष्णा कडू, सारिका बांगडकर, शंकुतला चौधरी यांच्या आतिथ्यात झाला. प्रास्ताविक प्राचार्य रविकिरण भोजने यांनी केले. संचालन जिल्हा आयुक्त सुवर्णमाला थेरे व रेणुका भोयर यांनी केले़संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मी मराठी नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. स्काऊटचे राष्ट्रीय आयुक्त भाऊराव नगराळे यावेळी अतिथी म्हणून उपस्थित होते़ समारोपीय कार्यक्रमात स्काऊट गाईडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, मुख्याध्यापक, रोवर्स रेंजर्स व राष्ट्रपती पुरस्कार मिळविणारे स्वप्निल खोब्रागडे, दर्शन विलूरकर या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. इंडियन मिलीटरी शाळेच्या पथकाने सादर केलेला शिवाजी अफजलखान भेटीच्या पोवाड्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले़(तालुका प्रतिनिधी)