शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पदांच्या माहितीसाठी अडले बोरच्या बफर झोनच्या एकसंध नियंत्रणाचे घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

बोर व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन १३ हजार ८०० हेक्टर, तर बफर झोन ६७ हजार ८१४. ४६ हेक्टर आहे; पण बफर झोनची जबाबदारी सद्य:स्थितीत प्रादेशिक वन विभागाकडे आहे. आपत्कालीन परिस्थितीत कुठले ठोस निर्णय घेताना अधिकाऱ्यांची बहुधा तारांबळ उडते. याच समस्येवर मात करण्यासह वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन याला केंद्रस्थानी ठेवून बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला; पण मुंबई येथील अधिकारी प्रस्तावात त्रुटी काढण्यातच धन्यता मानत आहेत.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : देशातील सर्वांत छोटा व्याघ्र प्रकल्प अशी बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख असून, याच व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोनचा एकसंघ नियंत्रण (युनिफाइड कंट्रोल)चा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून शासनदरबारी धूळखात आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन २०१५ मध्ये जाहीर करण्यात आला,  तर त्याचे एकसंघ नियंत्रण हे वन्यजीवांच्या संरक्षणासह संवर्धनासाठी महत्त्वाचेच आहे.सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात सुमारे सहा प्राैढ वाघ, दहा ते बारा बिबटे, ३५ अस्वले, २६ हून जास्त रानकुत्री, हजारोंच्या संख्येने सांबर, चितळ, नीलगाय आदी वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. इतकेच नव्हे, तर या व्याघ्र प्रकल्पाच्या बफर, तसेच बफर झोनच्या शेजारी असलेल्या प्रादेशिक वन विभागाच्या जंगलांमध्येही मोठ्या संख्येने वाघांचे वास्तव्य आहे. त्यामुळे हा प्रकल्प वाघांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरणारा आहे.बोर व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन १३ हजार ८०० हेक्टर, तर बफर झोन ६७ हजार ८१४. ४६ हेक्टर आहे; पण बफर झोनची जबाबदारी सद्य:स्थितीत प्रादेशिक वन विभागाकडे आहे. आपत्कालीन परिस्थितीत कुठले ठोस निर्णय घेताना अधिकाऱ्यांची बहुधा तारांबळ उडते. याच समस्येवर मात करण्यासह वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन याला केंद्रस्थानी ठेवून बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला; पण मुंबई येथील अधिकारी प्रस्तावात त्रुटी काढण्यातच धन्यता मानत आहेत.नागपूर येथील प्रादेशिक वन विभागाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी युनिफाइड कंट्रोल प्रस्तावात अधिकाऱ्यांच्या बाबतीत पदांची सविस्तर माहिती मागितली असून, नागपूरचा प्रादेशिक वन विभाग आता या त्रुटीची पूर्तता करणार आहे. १५ एप्रिलनंतर पदाबाबतची सविस्तर माहिती वरिष्ठांना सादर होण्याची शक्यता असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

वर्ध्याच्या उपवनसंरक्षकांनी ८ मे २०२० ला पाठविला प्रस्ताव-    उपवनसंरक्षक वर्धा यांनी ८ मे २०२० रोजी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनच्या एकसंघ नियंत्रणाचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यांना पाठविला. त्यानंतर या कार्यालयाने हा प्रस्ताव कार्यालयीन कार्यवाही करून २१ मे २०२० रोजी अप्पर प्रधान मुख्य संरक्षक वन्यजीव यांना पाठविला. अप्पर प्रधान मुख्य संरक्षक वन्यजीव या कार्यालयाने हा प्रस्ताव शासनाला सादर केला असला तरी त्यावर अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण झाल्यास मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता येणार आहेत, तसेच या परिसराचे नियंत्रण हे वन्यजीव विभागाकडे जाणार आहे.

तीन रेंज होणार; अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची सेवा होणार अधिग्रहित-    बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण झाल्यास बफर हिंगणी, कवडस व खरांगणा असे तीन रेंज तयार होणार आहेत. इतकेच नव्हे, तर या क्षेत्रात येणाऱ्या प्रादेशिकच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.-    एकूणच बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे एकसंघ नियंत्रण झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा जिल्ह्यात वन्यजीवांचे संगोपन करण्यासाठीच होणार आहे.

 

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्प