शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘हिरकणी’ कक्ष ठरतोय कुचकामी

By admin | Updated: December 23, 2014 23:07 IST

बसस्थानकावर मुलांना स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबना होते. ही बाब हेरून राज्य शासनाच्यावतीने मुख्य बसस्थानकावर ‘हिरकणी’ कक्षाची स्थापना केली. या कक्षात बाळांच्या

महिला प्रवासी अनभिज्ञ : बसस्थानक आवारातच करतात बाळांना स्तनपानपराग मगर - वर्धाबसस्थानकावर मुलांना स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबना होते. ही बाब हेरून राज्य शासनाच्यावतीने मुख्य बसस्थानकावर ‘हिरकणी’ कक्षाची स्थापना केली. या कक्षात बाळांच्या स्तनपानासाठी सुविधा करून दिली. बसस्थानकावर असलेल्या या कक्षाची माहिती मात्र महिलांनाच नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले. बसस्थानकावर दिवसभर महिला, पुरूष प्रवाशांची गर्दी असते. अशावेळी चिमुकल्यांना स्तनपान करताना महिलांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. भूक लागताच ही चिमुरडी रडायला लागतात, यामुळे नाईलाजाने का होईना सर्वांच्या नजरा वाचवित महिलांना पदराआड मुलांना स्तनपान करावे लागते. अशावेळी आंबटशौकीन चोरट्या जनरेने त्यांच्याकडे बघतही असतात. ही बाब हेरून राज्य शासनाने ही सुविधा केली. कक्ष तयार करताना मात्र त्याबाबत जागृती करण्याचा विसर एसटी महामंडळाला पडल्याचे दिसून येते. बसथानकावर ही सुविधा असताना महिला उघड्यावर स्तनपान करताना दिसून येतात. वर्धा बसस्थानकावर फेरफटका मारला असता अनेक महिला प्रवाशांना बसण्याकरिता असलेल्या बाकांवर मुलांना स्तनपान करीत असल्याचे आढळले. त्यांना हिरकणी कक्षात मुलांना स्तनपान करण्याची सोय आहे, तिथे का जात नाही, असे विचारले असता हिरकणी कक्ष म्हणजे काय? हेच बहुतेक महिलांना माहिती नसल्याचे समोर आले.