शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणी गटाकडे लागले तालुक्याचे लक्ष

By admin | Updated: January 15, 2017 00:52 IST

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गट आणि पंचायत समितीच्या १२ गणासाठी निवडणूक लढविण्यास इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.

उमेदवाराबाबत उत्सुकता : इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू सेलू : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गट आणि पंचायत समितीच्या १२ गणासाठी निवडणूक लढविण्यास इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. सर्वत्र निवडणुकीची चर्चा रंगात आली असताना हिंगणी गटातील उमेदवाराकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. मतदानाची तारीख जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. हिंगणी गटात मागील निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. येथून विजयी झालेल्या चित्रा रणनवरे या जि.प. अध्यक्ष आहेत. यावेळी हिंगणी गट खुला प्रवर्गासाठी असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी जोर कसला आहे. या गटातून निवडणूक लढविण्यास भाजपाकडे इच्छुकांची गर्दी असून जि.प. सदस्य राणा रणनवरे व शहर भाजपा अध्यक्ष वरूण दप्तरी यांचे नाव आघाडीवर आहे. काँगे्रसकडून माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजय डेकाटे यांचे नाव चर्चेत आहे. महेंद्र माहुरे अपक्ष लढणार असल्याचा तर्क आहे. हिंगणी गणात काँग्रेसकडून नितीन निधडे, प्रवीण तोटे, भाजपाकडून अशोक डेकाटे, अनिल बोकडे तर राष्ट्रवादीकडून अमर कोकाटे यांचे नाव चर्चेत आहे. अशोक मुडे या निवडणुकीत उमेदवारी दाखल करणार काय याकडे राजकीय जानकारांचे लक्ष लागले आहे. घोराड गणात भाजपाकडे अनेक इच्छुक आहे. बाजार समितीचे संचालक विलास वरटकर, तालुका भाजयुमोचे अध्यक्ष विकास मोटमवार, घोराड ग्रा.पं.चे उपसरपंच अमित तेलरांधे अशी नावे आहे. काँग्रेसकडून संजय धोंगडे, अशोक येळणे, प्रहार पक्षाकडून मिलिंद गोमासे यांचे नाव असून या गणातून मागील निवडणुकीत विजयी झालेल्या रजनी तेलरांधे आगामी निवडणुकीत पुन्हा अपक्ष उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. यात भाजप कोणत्या उमेदवाराची निवड करते याबाबत उत्सुकता आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे विजय जयस्वाल व भाजपाचे राणा रणनवरे यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीमुळे येळाकेळी गट चर्चेत होता. यावेळी जयस्वाल विरूद्ध रणनवरे अशी लढत हिंगणी गटात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील मतदारांचे लक्ष हिंगणी गटाकडे लागले आहे.(शहर प्रतिनिधी)