शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

किरणोत्सर्गामुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: July 13, 2015 02:11 IST

स्थानिक पुखराज कोचर वॉर्डातील रहिवासी परिसरात असलेल्या मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या किरणोत्सरी

जिल्हाधिकारी यांना निवेदन : मोबाईल टॉवर स्थलांतरित करण्याची मागणीहिंगणघाट : स्थानिक पुखराज कोचर वॉर्डातील रहिवासी परिसरात असलेल्या मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या किरणोत्सरी उच्च लहरीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सदर टॉवर स्थलांतरित करण्याची मागणी परिसरातील रहिवाश्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येथील कोचर वॉर्डात २००२ साली रिलायन्स कंपनीला मोबाईल टॉवर उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र नगर पालिकेच्या वतीने देण्यात आले. परंतु परिसरातील नागरिकांचे त्यासाठी संमतीपत्र घेण्यात आले नसल्याचे निवेदनात नमूद आहे. सुरूवातीला या टॉवरची क्षमता कमी होती. आता या टॉवरची क्षमता ३०० मीटर झाली असून त्यातून निघाऱ्या किरणोत्सरी उच्च लहरीमुळे हा परिसरत प्रभावित होत असल्याचे नागरिक सांगत आहे. हा परिसर रहिवासी नागरिकांची वस्ती असलेला परिसर आहे. त्यातच मोबाईल टॉवरची क्षमता वाढल्याने परिसरातील रहिवाश्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार परिसरातील नागरिक करीत आहे.मोबाईल टॉवरमधून निघाणाऱ्या उच्च लहरी मायक्रोवेव्ह ओव्हन या प्रकारातील असतात. या लहरींचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. परिणामी अर्धांगवायूचा झटका येणे, डोकेदुखी, चक्कर, झोप न लागणे, यांसारखे विकार जडण्याचा धोका असतो. लहान मुलांवरही याचा थेट परिणाम होतो. सुरूवातीला या टॉवरची क्षमता कमी असल्याने नागरिकांनी दुर्लक्ष केले. परंतु अलीकडे ही क्षमता वढविल्याने सदर टॉवरच येथून हटवावे अशी मागणी कोचर वॉर्डातील अनेक नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात दूरसंचार मंत्रालय, नवी दिल्ली, आरोग्य मंत्रालय, मुंबई आणि उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना यापूर्वीच निवेदन दिले होते. तरीही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे टॉवरला स्थलांतरित करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.शिष्टमंडळात विजय येनपुतवार, गजानन ढुमे, प्रशांत पापटीवार, अब्बास अली अजानी, सुरेश मुंजेवार, भाविक सांगानी, पांडूरंग गलांडे, नरेंद्र चाफले, पुंडलिक हुलके, राकेश शर्मा, विजय भांडवलकर, राजू चौधरी, सचिन धुमकेतू, अशोक देवगीरकर, अनिल महाजन, आशिष हाते, विनोद दाऊ, संतोष खाडे, अशोक जयस्वाल, यासह ५१ नागरिकांचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी) टॉवर उभारतेवेळी अधिसूचना अस्तित्वात नव्हतीहिंगणघाट नगरपालिका क्षेत्रातील विविध कंपन्यांची एकूण १७ मोबाईल टॉवर असून काही मोबाईल टॉवर तर शहराच्या मध्यवस्तीत आहेत. टॉवर उभारण्यासाठी, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना दि. ५ मार्च २०१४ अन्वये नाहरकत देण्यापूर्वी संबंधित परिसरातील नागरिकांची समंती आवश्यक असते. कोचर वॉर्डातील सदर टॉवरला उभारणीकरिता न.प. कार्यालयाकडून ०३ आॅगस्ट २००२ ला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यावेळी ती अधिसूचना अस्तित्वात नव्हती. ती अधिसूचना ४ मार्च २०१४ नंतर अंमलात आली. त्यामुळे तेथील नागरिकांची सम्मती घेण्यात आली नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. ४ मार्च २०१४ नंतर कोणालाही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. मोबाईल टॉवरकरिता मागील ५ वर्षात १७ मोबाईल टॉवर कडून करापोटी पालिकेला १७ लाख ५० रू. चे उत्पन्न मिळाले होते. नगरपालिका आणि टॉवर कंपनीशी कोणताही करारनामा नसून फक्त नाहरकत प्रमाणपत्र दिल्या गेल्याचेही माहिती अधिकारात उघड झाल्याचे नागरिकांनी सांगितले.