शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक जबाबदारीतून मुक्त; पण मदत कायमच

By admin | Updated: August 5, 2014 23:50 IST

शालेय पोषण आहार मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांसाठी संकट ठरले होते; पण शासन आदेशानुसार ही जबाबदारी बचत गटांवर सोपविण्यात आली़ यामुळे मुख्याध्यापक या जबाबदारीतून मुक्त झाले;

सेवाग्राम : शालेय पोषण आहार मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांसाठी संकट ठरले होते; पण शासन आदेशानुसार ही जबाबदारी बचत गटांवर सोपविण्यात आली़ यामुळे मुख्याध्यापक या जबाबदारीतून मुक्त झाले; पण काही ठिकाणी बचत गट शालेय पोषण आहाराचे काम करण्यास तयार नसल्याने स्वयंपाकी महिलांसह मुख्याध्यापकांवरच नाईलाजास्तव जबाबदारी आल्याचे दिसून येते़शालेय विद्यार्थ्यांचे वय, शाळेच्या तासांचा कालावधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शाळेतच पोषण आहार मिळावा, या उदात्त हेतूने ही योजना शासनाने सुरू केली. याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकावर असल्याने एक ना अनेक भानगडी निर्माण झाल्या़ ही योजना राबविताना अनेक कसरती कराव्या लागल्या. दोषांचे खापरही फुटू लागले. मुख्याध्यापक संघटनांनी यास विरोध दर्शविला़ यामुळे शालेय पोषण आहार बचत गटांना सुपूर्द करण्याचा मार्ग काढण्यात आला़ यामुळे मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांना सुटलो एकदाचे! असे झाले; पण काही ठिकाणी बचत गटांनी आहाराचे कामच स्वीकारले नाही़ यामुळे आता कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ शेवटी आपलेपणाच्या भावनेतून स्वयंपाकी महिलांच्या मदतीने आहार योजनेचे काम सुरू ठेवावे लागले. शाळेचे प्रमुख म्हणून मुख्याध्यापकावर जबाबदारी आहे़ या योजनेवर त्यांचे लक्ष व नियंत्रण आहे; पण त्यांना शाळेतील सर्व शिक्षक मदत करतील़ जेणेकरून कामाचा ताण वाढणार नाही, तशी कामांची विभागणी सुचविण्यात आली आहे. आहारातून कोणताही विषबाधा वा इतर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकास जबाबदार धरले जाणार नाही तर बचतगट व स्वयंपाकी महिलांना जबाबदार धरून चौकशी करण्यात येणार आहे. यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकही मदतीस तयार झालेत़ योजनेच्या मालाची तपाणी, नोंदी, साठा, मागणी आदी कामे जिकरीची असल्याने नको ही योजना, अशीच भूमिका बचत गटांनी घेऊन त्याकडे पाठ फिरविल्याचे दिसते़(वार्ताहर)