शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांकडून पिकाची नासाडी

By admin | Updated: July 9, 2014 23:49 IST

नजीकच्या धनोडी(बहाद्दरपूर) येथील शेतकरी राजेश हरीप्रसाद जयस्वाल यांच्या चार एकर शेतात पेरलेले सोयाबीन रानडुकरांच्या कळपाने उदध्वस्थ केले. तसेच शेतात मोठमोठे खड्डे करून ठेवले आहे.

रोहणा : नजीकच्या धनोडी(बहाद्दरपूर) येथील शेतकरी राजेश हरीप्रसाद जयस्वाल यांच्या चार एकर शेतात पेरलेले सोयाबीन रानडुकरांच्या कळपाने उदध्वस्थ केले. तसेच शेतात मोठमोठे खड्डे करून ठेवले आहे. यात जयस्वाल यांचे मोठे नुकसान झाले आहे. २८ जूनला धनोडी येथील शेतकरी राजेश जयस्वाल यांनी या मौज्यातील सर्व्हे नंबर ६४ मधील १.६१ हेक्टर आर या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. तसेच त्यांनी पिकांना खतही दिले. शेतात पीक चांगले बहरले असताना ५ जुलैच्या रात्री शेतात जंगली डुकरांचा कळप शिरला. त्यांनी संपूर्ण चारही एकरातील सोयाबीनचे पीक नष्ट केले. जमीन उखरून शेतात अनेक ठिकाणी खड्डे करून ठेवले. दुसऱ्या दिवशी सदर बाब जायस्वा यांच्या लक्षात आली. त्यांनी वनविभागाच्या रोहणा येथील कार्यालयात अर्जाद्वारे ही बाब कळविली. मोक्याचा पंचनामा करून झालेल्या नुकसानाची त्वरीत भरपाई द्यावी अशी विनंती वजा मागणीही त्यांनी केली आहे. पावसाळ्यात तापत असलेल्या उन्हाळासदृश परिस्थितीने आधीच शेतकरी विवंचनेत सापडला आहे. चांगले उगविलेले सोयाबीन डूकरांनी नष्ट केल्याने आता शेतात काय पेरावे हा मोठा प्रश्न राजेश जयस्वाल यांच्यासमोर उभा आहे. जंगली श्वापदे नेहमीच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करीत असतात. पण वनविभाग झोपेचे सोंग घेवून निद्रिस्त असल्याने अर्ज, विनंतीचा फायदा न होता वन विभाग त्याला केराची टोपली दाखविण्यातच धन्यता मानते. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी केली जात आहे.(तालुका प्रतिनिधी)