शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसाठी घेतले उलटे टांगून

By admin | Updated: September 4, 2014 23:59 IST

लाल नाला व पोथरा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली; पण कारवाई झाली नाही़ यामुळे प्रशासनाची झोप उघडावी म्हणून प्रहार संघटनेने अभिनव आंदोलन केले.

लालनाला व पोथरा प्रकल्प : अभिनव आंदोलनाने सारेच चकितसमुद्रपूर : लाल नाला व पोथरा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली; पण कारवाई झाली नाही़ यामुळे प्रशासनाची झोप उघडावी म्हणून प्रहार संघटनेने अभिनव आंदोलन केले. तहसील कार्यालयाच्या समोरील चिचेंच्या झाडाला गजानन कुबडे यांनी उलटे लटकवून घेतले. या आंदोलनामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली़ यात दहा आंदोलकांना अटक करून सुटका करण्यात आली़प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या सुटाव्या याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक निवेदने देण्यात आली़ यात कोरा व पोथरा प्रकल्पग्रस्तांना ज्यांची गावे पुनर्वसित झाली, त्यांना मुलभूत सुविधा देण्यात याव्या, दोन्ही प्रकल्पातील अनेकांचे अनुदान प्राप्त झाले नाही, प्रकल्पाचे वेस्टविअरमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाते, यामुळे त्याची रूंदी वाढवावी, वडिलांच्या नावे असलेल्या शेतीचे १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर वाटणीपत्र व्हावे, निराधार योजनेंतर्गत द्यावयाचे अर्ज ग्रामीण स्तरावर तलाठ्याने स्वीकारावे, उसेगाव येथील पाणी टंचाई कायम दूर करावी, भूमी अधिकार अभिलेख कार्यालयाने पुनर्मोजणी व एकत्रीकरणातील चुकांची करून द्यावी आदी मागण्यांचा समावेश होता; पण प्रशासनाने या निवेदनाकडे दुर्लक्ष केले़ यामुळे प्रहारने आंदोलनाचा प्रवित्रा घेतला. गुरूवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय परिसरात चिंचेच्या झाडाला गजानन कुबडे यांनी स्वत:ला उलटे लटकवून घेतले़ समुद्रपूर पोलिसांनी आंदोलनकर्त्यास ताब्यात घेतले. शिवाय पोलिसांनी गजानन कुबडे, देवा धोटे, सुरेश नारनवरे, राजेश बोभाटे, राजेंद्र व मंगेश तांदूळकर, राहुल भगत, रवींद्र चौधरी, प्रदीप मून, प्रवीण जायदे या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले़ मुंबई पोलीस कायदा १३५ नुसार ठाणेदार अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात उमेश हरणखेडे यांनी ही कारवाई केली.(तालुका प्रतिनिधी)