शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पुतळा वादाला अंतर्गत गटबाजीची किनार

By admin | Updated: July 21, 2015 02:52 IST

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण जागेच्या आकाराबाबत आंबेडकरी समाजाच्या दोन गटातील मतभेद

देवळी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण जागेच्या आकाराबाबत आंबेडकरी समाजाच्या दोन गटातील मतभेद चव्हाट्यावर आले. यामुळे गोंधळ सदृश्यस्थिती निर्माण झाली. नगराध्यक्ष शोभा तडस, पोलीस उपअधीक्षक राजन पाली व पोलीस निरीक्षक साखरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजाच्या एका गटासोबत जागेबाबतचा तोडगा काढण्यात आला; परंतु याच दरम्यान दुसऱ्या गटाच्या महिलांनी या वादग्रस्त जागेवर धडक देत येथील खड्डे बुजविल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली.या वादाबाबत स्थानिक न.प. प्रशासन व आंबेडकर स्मारक समितीच्या एका गटाने संयुक्त पत्रक प्रसिद्ध करून भूमिका विषद केली. पुतळा सौंदर्यीकरणाच्या मुद्याबाबत स्थानिक न.प.मध्ये आंबेडकरी समाजाच्या एका गटासोबत शुक्रवारी बैठक झाली. यामध्ये सौंदर्यीकरणासाठी ८ हजार १२५ चौ. फुट जागा देण्यासोबत १० लाखचा शासकीय निधी तसेच पुतळ्याच्या बाजूला प्रसाधनगृह राहणार नसल्याच्या अटीवर समेट घडूवन आणण्यात आला. त्यानुसार जागेच्या आखणीचे खड्डे खोदत असताना माजी नगराध्यक्ष गौतम पोपटकर यांच्या गटाने घटनास्थळी येवून व्यत्यय निर्माण केला. यामुळे त्यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करण्यात आल्याचा आरोप एका प्रसिद्ध पत्रकातून करण्यात आला.जागेच्या आकाराचा मुद्दा प्रतिष्ठेचा न बनविता गावात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी सामंजस्याने हा प्रश्न निकाली निघावा, अशी अपेक्षा प्रसिद्ध पत्रकातून नगराध्यक्ष शोभा तडस, उपाध्यक्ष विजय गोमासे व न.प. सदस्य राजेश बकाने यांनी केली. न.प. सोबत झालेल्या समेट बैठकीत आंबेडकरी समाजाच्या एका गटाच्या वतीने माजी नगरसेवक रितेश लोखंडे, नम्रता कोल्हटकर, माजी पं.स. उपसभापती मारोती लोहवे, दिनेश भगत, भीमजय म्हैसकार व इतरांचा समावेश होता. बाबासाहेबांच्या नावावर दिशाभूल करून सौंदर्यीकरणाच्या मुद्यात वेगळे वळण मिळू नये. समाजाने कणखर भूमिका न घेता जातीय सलोखा निर्माण करावा, अशी विनंती समाजाच्यावतीने कोल्हटकर व लोहवे यांनी केली. (प्रतिनिधी)४पुतळा सौंदर्यीकरणासाठी ८ हजार १२५ चौ. फूट जागा देण्यासोबत १० लाखांचा शासकीय निधी तसेच पुतळ्याच्या बाजूला प्रसाधनगृह राहणार नसल्याच्या अटीवर समेट घडूवन आणण्यात आला. मात्र दोन गट समोरासमोर आल्याने वाद निर्माण झाला.