शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वाहनांना हिरवा रंग

By admin | Updated: September 16, 2016 02:54 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सर्व टप्प्यांवर अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सुधारित धान्य वितरण

वर्धा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सर्व टप्प्यांवर अधिक पारदर्शकता आणण्यासाठी सुधारित धान्य वितरण प्रणाली राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यात एकाच कंत्राटदारामार्फत सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरण करण्यात येणार आहे. याकरिता लागणारी वाहने एकाच रंगाची राहणार आहे. धान्याचा पुरवठा करणारी ही वाहने हिरव रंगाची राहणार आहे. या एकाच रंगामुळे सामान्य नागरिकांनाही ही वाहने ओळखणे शक्य झाले होणार असून यात होणाऱ्या गैरप्रकारांना यामुळे आळा बसणार आहे. सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत बोगस लाभार्थी टाळण्यासाठी शासनाने सर्व लाभार्थ्यांचे आधार लिंकींग करणे सुरू केले आहे. जिल्ह्यात एकूण १३ लाख ५७ हजार ४५ शिधापत्रिका धारक आहे. यामध्ये ६५ टक्के आधार लिकींग झाले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभ घेणाऱ्या अंत्योदय व प्राधान्य गटामध्ये ८ लाख ८२ हजार ३६७ लाभार्थी असून यातील ९५ टक्के लाभार्थ्यांचे आधार कार्डाशी लिंकींग झाले आहेत. याशिवाय राज्यशासनाने सर्व शेतकऱ्यांना स्वस्त दराने धान्य वितरण सुरू केले असून अशा शेतकऱ्यांची संख्या २ लाख ४९ हजार ९१६ एवढी आहे. या सर्व लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वितरण करण्यात येते. भारतीय खाद्य निगमचे गोदाम ते शासकीय गोदाम आणि शासकीय गोदाम ते स्वस्त धान्य दुकानदार या प्रवासात होणारी धान्याची चोरी थांबविण्यासाठी जिल्ह्यात एकाच कंत्राटदारामार्फत धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे. भारतीय खाद्य निगम ते शासकीय गोदामात धान्य पोहचविण्यासाठी ३४ वाहने वापरण्यात येत आहेत. तर राज्य शासनाने गोदाम ते रास्तभाव दुकानांमार्फत ७८ वाहनांमार्फत धान्य पोहचविण्यात येत आहे. या सर्व वाहनांना ओळखण्यासाठी हिरव्या रंगाने रंगवण्यात आले आहे. त्याचबरोबर ‘सुधारित धान्य वितरण प्रणाली, महाराष्ट्र शासन’ असा फलक वाहनाच्या समोरील भागावर लावण्यात आला आहे. त्यामुळे ही वाहने सहज ओळखता येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अशा वाहनांमधील धान्य स्वस्त धान्य दुकानांच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी उतरत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर सामान्य नागरिकांचे लक्ष राहणार असून गैरप्रकारांना आळा बसण्यास निश्चितच मदत होईल, असे कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)