शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

नातवाच्या मृत्यूप्रकरणी आजीवर गुन्हा

By admin | Updated: July 16, 2016 02:20 IST

तीन महिन्यांच्या बाळाला ओढाताण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे म्हणत बाळाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.

सुनेच्या तक्रारीवरून चौकशी : वैद्यकीय अहवालावरून पोलिसांची कारवाई वर्धा : तीन महिन्यांच्या बाळाला ओढाताण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे म्हणत बाळाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी केलेल्या तपासात बाळाच्या मृत्यूला आजी कारणीभूत असल्याचे म्हणत तिच्यावर भादंविच्या कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या आजीचे नाव कौशल्या पितके (६५) रा. रसुलाबाद असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसुलाबाद येथील चंद्रकांत पितके यांचा तीन महिन्यांचा मुलगा सौरभ याचा १५ जून २०१६ रोजी पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी बाळाच्या आईच्या तक्रारीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चौधरी यांनी केला. तपासादरम्यान या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल मागविण्यात आला. या अहवालानुसार बाळाला ओढाताण केल्यामुळे त्याच्या फुफ्फुसाला जखम झाली. यामुळे त्याच्या छातीत रक्त गोठल्याने त्याला श्वास घेण्यात त्रास होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमुद करण्यात आले आहे. या अहवालावरुन पोलिसांनी तपास केला असता सदर बाळ हे कौशल्या पितके यांच्या ताब्यात असताना त्याला ओढाताण केल्यामुळे त्याच्या फुफ्फुसाला जखम झाल्याचा आरोप मुलाच्या आईने केला. यावरून पोलिसांनी कौशल्या पितके यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.(स्थानिक प्रतिनिधी) फुफ्फुसात रक्त गोठले मृत्यू झालेल्या बालकाच्या फुफ्फुसात जखम झाल्याने त्याचे रक्त गोठले. यामुळे त्याला श्वास घेता आला नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.