शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

तीन कंत्राटी ग्रामसेवकाकडे ६३ ग्रा.पं.चा कार्यभार

By admin | Updated: July 8, 2014 23:37 IST

ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. याकाळात सेलू तालुक्यातील तीन कंत्राटी ग्रामसेवकांकडे ६३ ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून

घोराड : ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. याकाळात सेलू तालुक्यातील तीन कंत्राटी ग्रामसेवकांकडे ६३ ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून ऐन महाविद्यालयीन प्रवेशाच्या काळात विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र व दाखल्याकरिता भटकंती करावी लागणार आहे. ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे हा कार्यभार कंत्राटी ग्रामसेवकाकडे सोपविण्यात येत असला तरी यामुळे प्रशासकीय ओढाताण होणार आहे.याबाबत ७ जुलैला गटविकास अधिकारी यांनी काढलेल्या क्रापंससे , पंचायत, स्था, कावि- ११४२/२०१४ च्या ग्राम विकास जलसंधारण विभागाचे पत्र प्रकाशित करण्यात आले. यानुसार आंदोलनामुळे ग्रामपंचायतीची दैनंदिन कामे खोळंबली आहे. त्यामुळे दाखले प्रमाणपत्रे तसेच ग्रामपंचायतीचे अत्यावश्यक कामासाठी तीन कंत्राटी ग्रामसेवक याच्याकडे कार्यभार देण्यात येत आहे. संबंधित ग्रामपंचायतीच्या चाव्या व रबरी शिक्के घेवून दिलेले कार्य करावे. संप कालावधीत पंचायत समिती सेलू येथे राहून सदर कार्य करावयाचे आहे, असे नमुद आहे. या पत्रकानुसार तीन कंत्राटी ग्रामसेवकात डी. एस. लांजेवार यांच्याकडे आकोली, आमगाव(म), अंतरगाव, बाभुळगाव, बोरी (को), बोरखडी (क), गरमसुर, गिरोली, हिंगणी, जामणी, खैरी, क्षीरसमुद्र, रेहकी, नानबर्डी, रिधोरा, सालई (कला) सालई (पेवठ) सोंडी, सुकळी (बाई), वडगाव (कला) वडगाव (खुर्द), वडगाव (जं) येळाकेळी, झडशी या गावांचा प्रभार आहे.तसेच एस. एच. सिर्सीकर यांच्याकडे बोंडसुला, आमगाव (ख), आलगाव, चानकी, चारमंडळ, दहेगाव, देऊळगाव, दिग्रस, दिंदोंडा, हमदापूर, हेलोडी, केळझर, खापरी (ढो), खापरी (शि.), पळसगाव (बाई) पिंपळगाव, टाकळी (कि़) वघाळा सुरगाव, तळोदी या गावांचा कार्यभार आहे. एस. एस. लंगडे यांच्याकडे जयपुर, जूनगड, जुनोना, कान्हापूर, खडका, कोपरा, कोटंबा, महाबळा, मोई, नवरगाव, रमणा, सेलू, सुकळी (स्टे), वाहितपुर, घोराड ही गावे सोपविण्यात आली आहे. या आदेशातील प्रत पंचायत समिती कार्यालयात भिंतीवर चिपकवून प्रकाशित करण्यात आली आहे. सदर ग्रामसेवकाचे मोबाईल नंबर दिले असून गरजू ग्रामस्थांना मोबाईलवर किंवा पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधावा लागणार आहे; पण पंचायत समितीने ग्रामस्थांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी या कार्यक्षेत्रातील गावे २५ ते ३० किमी परिसरात येत असल्याने ग्रामस्थांना अडचणीचे ठरू पाहत आहे. या कामबंद आंदोलनात सेलू पंचायत समिती अंतर्गत ६३ ग्रामपंचायतींपैकी ५७ ग्रा.पं. चे ३६ ग्रामसेवक सामील आहेत. यात लांबट, लोखंडे, पी.व्ही. पवार, किर्ती राऊत, सी.एस. देशमुख, एस.एफ. डोंगरे, जे.डी. राठोड, एस. पी. राऊत, ए.एस. श्रीवास्तव, शुभांगी बोळे, सडमाके, गावंडे, वाटकर, कानतोडे, गुडवार, गुजरकर, चिंंचमलातपुरे, दासलवार, चव्हाण, करपाते, पुसनायके, नागपूरकर, खराबे, कोटंबकर, वैरागडे, नव्हाळे, सपकाळ, माहुरे, शहारे, उमाटे, शेटे आदींचा समावेश आहे.(वार्ताहर)