शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावागावात ग्रामजागृती चळवळ निर्माण व्हावी

By admin | Updated: August 6, 2014 23:59 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची नित्य योजना आखली. यातूनच ग्राम जागृतीची चळवळ उभी झाली. या चळवळीतून निर्माण होणारी शक्तीच गावागावात सत्कर्माची भक्ती समजावी.

हिंगणघाट : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची नित्य योजना आखली. यातूनच ग्राम जागृतीची चळवळ उभी झाली. या चळवळीतून निर्माण होणारी शक्तीच गावागावात सत्कर्माची भक्ती समजावी. आणि ती प्रत्येकाने जीवनात आचरल्यास त्यासारखा दुसरा भाग्यवंत नाही, असे मत ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांनी व्यक्त केले.भारतीय युवा संस्कार परिषद व भारतीय बहुउदेशीय युवा संस्कार मंडळ यांचे संयुक्त विद्यमानाने दिवाकर अलोणी स्मृती सेवाभाव पुरस्कार २०१४ रामकृष्ण बेलूरकर, ग्रामगीताचार्य वरखेड यांना प्रदान करण्यात आला. आर्दश एकलव्य शिष्यदिन, गुरूकृतज्ञता सोहळा चुन्नीलाल कटारिया प्राथमिक शाळा येथे घेण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महेश ज्ञानपीठचे संस्थापक माजी नगराध्यक्ष गिरधर राठी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंचावर गांधी विचारक गजानन अंबुलकर, राष्ट्रीय नकलाकार हरिभाऊ बेलूरकर, श्याम अलोणी, प्रा. डॉ. उषा साजापूरकर, डॉ. शरद कुहीकर, संस्था सचिव प्रदीपकुमार नागपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी त्यांना शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह, परिषद गौरव चिन्ह, मानपत्र तथा रोख पुरस्काराने गौरविण्यात आले. या अगोदर हा पुरस्कार शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया, डॉ. अविनाश सावजी, डॉ. किशोर मोघे, गांधीवादी विचारक श्यामसुंदर शेंडे, अनिलकुमार रूद्रकार, आदी मान्यवरांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी दहावी १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत विशेष प्राविण्य व उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श एकलव्य शिष्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यात अनिकेत बोरकुटे, वैष्णवी वझुरकर, पुनम गजरानी, शुभांगी ठाकरे, रविना सॅम्युअल, रेणुका धाईत, प्रतिक्षा कुत्तरमारे, हेमंत जायदे, पियुष उजवणे, रितिका मंत्री, मलक ओसामा मलक वहाब आदी विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. त्याचप्रमाणे गुरूकृतज्ञता म्हणून मंजुषा दौलत सागर, करीम उल्ला खाँ हबीबउल्ला पठाण यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक शरद कुहीकर यांनी केले. संचालन चेतन काळे आणि मनोहर शेंडे यांनी केले. आभार प्रदीपकुमार नागपूरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रसाद साळवे, नईम मलक, गजानन नांदुरकर, नरेंद्र पोहनकर, भीमसागर खैरकर आदींनी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)