शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. संगणक परिचालकांचा तिढा कायम

By admin | Updated: December 20, 2014 02:00 IST

ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा त्यांच्या वेतनासह इतरही मागण्यांकरिता गेल्या दोन महिन्यांपासून लाक्षणिक संप सुरू आहे.

वर्धा : ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा त्यांच्या वेतनासह इतरही मागण्यांकरिता गेल्या दोन महिन्यांपासून लाक्षणिक संप सुरू आहे. या मागण्यांचा निपटारा व्हावा म्हणून शासनाला अनेकदा निवेदने दिली; पण शासन वा प्रशासनाने संगणक परिचालकांचा तिढा अद्यापपर्यंत सोडविलेला नाही. यामुळे गत दोन महिन्यांपासून या परिचालकांच्या डोक्यावर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. आज ना उद्या सरकार आमचे प्रश्न सोडवतील व परत कामावर जाऊ, या प्रतिक्षेत हे संगणक परिचालक आहेत. शासनाने प्रत्येक ग्रा.पं.ला संगणकीकृत केले असून ग्रा.पं.ची सर्व कामे संगणकाद्वारे केली जात आहे. या कामाकरिता शासनाला प्रशिक्षित संगणक परिचालकाची गरज असल्याने प्रत्येक ग्रा़पं़ मध्ये संगणक चालकाची नियुक्ती करण्याकरिता एका कपंनीसोबत करार करण्यात आला होता. त्या कंपनीने विशिष्ठ मानधनावर राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती केली़ सुरूवातीपासून या कंपनीने संगणक परिचालकांचे आर्थिक शोषण करण्याचे काम सुरू केले. याविरोधात परिचालकांनी आवाज उठवत गेल्या दोन महिन्यापासून काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे. आर्थिक कोंडमारा होत असून बेरोजगारीमुळे नैराश्येच्या गर्तेत हे संगणक परिचालक आहे. यापैकी अनेक संगणक परिचालकावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असून दोन महिन्यांपासून त्यांचे पगार झालेले नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. याकडे शासन तसेच संबंधित विभागाने या संगणक परिचालकाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी त्यांची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)