शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय नोंदीतून जागाच झाली गायब

By admin | Updated: January 15, 2017 00:54 IST

सुकळी (उबार) ग्रामपंचायतच्या मकान कर आकारणी नकलेत इसमाच्या हक्काची असलेली जागा नोंदीतून बाद करण्यात आली आहे.

माहिती अधिकारात प्रकार उघडकीस वर्धा : सुकळी (उबार) ग्रामपंचायतच्या मकान कर आकारणी नकलेत इसमाच्या हक्काची असलेली जागा नोंदीतून बाद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अधिकारात ग्रामपंचायतकडे माहिती मागविली असता सदर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही नोंद पूर्ववत करण्याचे आदेश ग्रामपंचायतला देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शरद भोयर यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी आणि गटविकास अधिकारी, वर्धा पं.स. यांना दिले आहे. याबाबत वृत्त असे की शरद भोयर, यांची ४०६१ चौ. फु. जागा २०१०-११ च्या मकान कर आकारणी नकलेत दर्शविण्यात आली आहे. मात्र २०११-१२ च्या नकलेत ती जागा गायब असल्याने व्यथित होवून भोयर यांनी ग्रामपंचायतकडे माहिती अधिकारात अर्ज केला. या अर्जातून मिळालेल्या माहितीत ४०६१ चौ.फु. जागा दर्शविण्यात आलेली नसल्याची बाब उघडकीस आली. नोंदीतून ४०६१ चौ.फु. जागा परस्पर बेपत्ता कशी झाली याबाबत संभ्रम आहे. ही नेमकी गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही जागा अन्य नोंदीत जोडण्यात आल्यास जागेच्या मालकाला यापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ही चूक दुरूस्त करण्याचे आदेश देवून न्याय देण्याची मागणी भोयर यांनी केली आहे. याबाबत कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)