शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तूर खरेदीत लूट

By admin | Updated: June 4, 2017 00:58 IST

तकऱ्यांकडून तूर खरेदी करण्याकरिता खरेदी-विक्री संघाची सब एजन्ट म्हणून नियुक्ती केली आहे.

खरेदी-विक्री संघाचा प्रताप : संचालकच करताहेत तुरीचे मोजमापसुधीर खडसे। लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्याकरिता खरेदी-विक्री संघाची सब एजन्ट म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांकडून तुरीची खरेदी समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर सुरू आहे. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. मोजमाप आणि चाळणीचा खर्च शेतकऱ्यांकडून वसूल केला जात असून पावतीही दिली जात नाही. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. शेतकऱ्यांकडून सध्या पणन महामंडळ तूर खरेदी करीत आहे. यापूर्वी नाफेडकडून तुरीची खरेदी करण्यात आले. तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात झाल्याने भाव पडले. परिणामी, पणन संचालक वर्धाकडून शासकीय तूर खरेदी सुरू आहे. खरेदी- विक्री संघाकडून तुरीचे मोजमाप झाल्यानंतर चाळणी व मोजण्याचा खर्र्च ६० ते ७५ रुपये प्रती क्विंटल शेतकऱ्यांकडून नगदी स्वरूपात वसूल केला जात आहे. याची पावतीही दिली जात नाही. शेतकरी आपला माल चांगल्या किंमतीत जात असल्याने बिनदिक्कत खरेदी-विक्री संघाच्या कर्मचाऱ्याला ती रक्कम देत असल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने समुद्रपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष व समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय डेहणे तसेच खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष आनंद थुटे यांनी प्रती क्विंटल ६० रुपये भावाने मोजमापाचा खर्च दिला आहे. या लुटीतून पदाधिकारीच सुटले नाही तर सामान्य शेतकऱ्यांचे काय, हा प्रश्नच आहे. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी आहेत. त्यांनी या बाबीची दखल घेणे गरजेचे झाले आहे. या हंगामात १४ हजार २१४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून ६५ रुपये भावाने प्रति क्विंटलप्रमाणे आजपर्यंत १ लाख १८ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. त्या रकमेचा हिशेब संघाजवळ आहे काय, तो कोणत्या खात्यात जमा आहे, हे प्रश्न अनुत्तरीत आहे. समुद्रपूर कृउबासचे संचालक वसंत महाजन हे मोजमाप करण्याचे काम सांभाळत आहे. बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सहकारी सोसायटी मतदार संघातून ते निवडून आले आहेत. नियमानुसार संचालकाला मार्केट यार्डमध्ये मोजमाप करण्याचे काम करता येत नाही. असे असताना हा प्रकार सुरू आहे. स्थानिक बाजार समिती प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. ही लूट थांबावी म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आ. समीर कुणावार यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. यावरून आमदारांनी डीएमओ पणन संचालक यांना माहिती देत चौकशी अहवाल मागितल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकरी लुटीतून १.१८ लाख रुपयांची केली वसुलीयेथील बाजार समितीमध्ये या हंगामात १४ हजार २१४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडून प्रती क्विंटल ६५ रुपयांच्या हिशेबाने खरेदी-विक्री संघटनेने १ लाख १८ हजार रुपयांची अवैधरित्या वसूल करण्यात आले आहे. या प्रकरण चौकशी करणे गरजेचे झाले आहे. ५० किलोसाठी ३१ रुपये माप करण्याचे हमाली खर्च तर ३ रुपये मोजाईचा खर्च येतो. शिवाय शेतकऱ्यांचा माल उतरवणे, चाळणी करणे असा एकूण ६५ रुपयांचा खर्च असून तो शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो. - मोतीराम जीवतोडे, ग्रेडर व ख.वि.संघ व्यवस्थापक.शेतकऱ्यांच्या तुरीला भाव नसल्यामुळे शासन मदतीचा हात देत आहे. अशा प्रकारे खरेदी-विक्री संघाने शेतकऱ्यांची लूट करणे व अवैध वसुली करणे चुकीचे आहे. याची दखल घेत मी डीएमओला अहवाल मागितला आहे. अहवालानुसार दोषींवर कार्यवाही करण्यात येईल.- समीर कुणावार, आमदार, हिंगणघाट-समुद्रपूर.