शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात उपचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

काहींच्याच तोंडावर मास्क लावलेला होता. अशीच परिस्थिती ओपीडींच्या ठिकाणीही होती. रुग्णालय परिसरात वावरणाऱ्या व्यक्तींपैकी अर्धेअधिक व्यक्ती विनामास्क दिसून आले. रुग्णांसोबत वाॅर्डात असणाऱ्यांसह कार्यरत काही कर्मचाऱ्यांनाही मास्कचा विसर पडला होता. यावरुन नागरिक अद्यापही कोरोना आणि ओमायक्राॅन आजाराबाबत बिनधास्त असल्याने रुग्णालयातूनही ओमायक्रॉनचा धोका संभवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेण्याची गरज आहे.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वातावरणातील बदलांमुळे आजारही बळावले असून, सामान्य रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्याने पुन्हा मास्क लावणे, हॅण्डवॉश करणे आणि सोशल डिस्टन्स पाळणे आदी सूचना करण्यात आल्या आहेत. पण, जिल्हा सामान्य रुग्णालयातच याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात नोंदणीकरिता सकाळपासून रुग्णांची गर्दी होत असते. गुरुवारी दुपारी येथे पाहणी केली असता, रुग्ण दाटीवाटीने नोंदणी करण्याकरिता रांगेत उभे होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. यावेळी काहींच्याच तोंडावर मास्क लावलेला होता. अशीच परिस्थिती ओपीडींच्या ठिकाणीही होती. रुग्णालय परिसरात वावरणाऱ्या व्यक्तींपैकी अर्धेअधिक व्यक्ती विनामास्क दिसून आले. रुग्णांसोबत वाॅर्डात असणाऱ्यांसह कार्यरत काही कर्मचाऱ्यांनाही मास्कचा विसर पडला होता. यावरुन नागरिक अद्यापही कोरोना आणि ओमायक्राॅन आजाराबाबत बिनधास्त असल्याने रुग्णालयातूनही ओमायक्रॉनचा धोका संभवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेण्याची गरज आहे.

ना सोशल डिस्टन्सिंग... -  कोरोनापासून स्वत:ला सावरण्याकरिता सोशल डिस्टन्स पाळणे अनिवार्य आहे. परंतु, निर्बंध हटवल्यानंतर सर्व काही सुरळीत व्हायला लागल्याने नागरिकांनाही सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडला. आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला असतानाही चक्क सामान्य रुग्णालयातही या नियमांना वाकुल्या दाखविल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांचे दुर्लक्षच...- जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाकाळापासूनच जिल्हा शल्य चिकित्सकांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. या संदर्भात अनेक तक्रारीही झाल्या आहेत. पण, अद्यापही सुधारणा झालेली नाही. आताही रुग्णालय परिसरात रुग्णासह नातेवाईकांची गर्दी वाढत असून, ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग असाच प्रकार दिसून येत आहे. याकडे लक्ष देत सूचना करण्याची गरज आहे. 

ना मास्क...-   घराच्या बाहेर पडताना प्रत्येकाने आपल्या तोंडावर मास्क लावणे आवश्यक आहे. पण, दरम्यानच्या काळात हा मास्क हनुवटीवर आला तर आता तो दिसेनासा झाला आहे. बाजारपेठेसह सामान्य रुग्णालयात गर्दी होत असून, यावेळी नागरिकांकडून मास्क लावला जात नसल्याचेच चित्र दिसून येते.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल