शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

शहीदभूमीला उपविभागाचा दर्जा द्या

By admin | Updated: March 6, 2015 01:57 IST

स्वातंत्र्यलढ्यात १९४२ मध्ये बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री बॅँ. ए.आर. अंतुले यांनी १९८२ साली शहीदभूमीला तालुक्याचा दर्जा दिला.

आष्टी (शहीद) : स्वातंत्र्यलढ्यात १९४२ मध्ये बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मृती कायम तेवत राहाव्या म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री बॅँ. ए.आर. अंतुले यांनी १९८२ साली शहीदभूमीला तालुक्याचा दर्जा दिला. मात्र आजही येथे सोयीसुविधांचा अभाव आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने कारंजा तालुक्याला नव्याने उपविभाग दिला. सदर उपविभाग हा आष्टी (श.) तालुक्याला देण्यात यावा, अशी मागणी जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, अतिरिक्त मुख्यकार्यपालन अधिकारी प्रमोद पवार यांच्याकडे सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात आली.या मागण्यांवर विचार करून कार्यवाही करण्याची सहमती संबंधितांनी दर्शविली आहे. जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्वीत आष्टी (श.) व कारंजा (घा.) तालुका जोडलेला होता. यानंतर शासनाने जिल्ह्यात एक नवीन उपविभाग देण्याचा निर्णय दोन वर्षाआधी घेतला होता. मात्र याची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही. यातच एक आठवड्यापूर्वी जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ यांनी स्थानिक परिस्थिती विचारात न घेताच कारंजा (घा.) तालुक्याला उपविभाग दिला, असे निवेदनात नमुद केले आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील आष्टी, साहुर, लहान आर्वी या तीन सर्कलला कारंजा उपविभागला जोडले. तर तळेगाव सर्कल आर्वी उपविभागाला कायम ठेवले. परंतु आष्टी तालुक्याला कारंजा उपविभाग उलट गैरसोयीचा ठरणारा आहे. आष्टी ही शहीदांची भूमी आहे. म्हणून आष्टीलाच उपविभाग द्यावा, अन्यथा आष्टी तालुका आर्वी उपविभागाला कायम ठेवावे. या मागणीकरिता सर्व सर्कलच्या सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जि.प. सदस्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, सीईओ संजय मीना यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आष्टी (श.) तालुका आर्वी उपविभागाला पूर्वीप्रमाणेच कायम ठेवल्याचे सांगितले. यावेळी माजी जि.प. सदस्य रमेश वरकड, सरपंच संघटना आष्टी तालुका अध्यक्ष प्रभाकर लांडे, सरपंच साहुर वनीता लवणकर, माजी सरपंच साहुर प्रशांत काकपूरे, धाडीचे सरपंच ऋषाली राजु चोरे, लहान आर्वीचे सरपंच सुनील साबळे, भाजयुमो अध्यक्ष गजानन भोरे, वडाळा उपसरपंच मनोज कोकाटे, भारसवाडा सरपंच रेखा लोखंडे यासह आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)