शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

कामगारांच्या समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी सोमवारी नागपूर विधीमंडळावर मोर्चा नेण्यात आला. कामगाराच्या या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केले. या मोर्चेकऱ्यांचे निवेदन राज्याचे वित्त नियोजन व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्वीकारले व कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देविधानभवनावर धडकला मोर्चा : वित्तमंत्र्यांनी जाणल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील आर.एस. मोहता मिल, गिमाटेक्स प्रायव्हेट लिमीटेड वणी, हिंगणघाट इटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क या कंपन्यांमध्ये कामगारांचे प्रचंड शोषण करण्यात येत आहे. येथील कामगारांच्या समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी सोमवारी नागपूर विधीमंडळावर मोर्चा नेण्यात आला. कामगाराच्या या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केले. या मोर्चेकऱ्यांचे निवेदन राज्याचे वित्त नियोजन व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्वीकारले व कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मोर्चेकऱ्यांच्यावतीने प्रा.तिमांडे यांनी सांगितले की आर.एस.आर मोहता मिल हिंगणघाटला १२० वर्ष पुर्ण होत आहे. २०१५ पर्यंत या मिल मध्ये १३०० कामगार कार्यरत होते. २०० ठेकेदारी कामगार होते. परंतु २०१७ पासून कपडा खाता बंद करण्यात आला आहे. ज्या कामगारांनी कंपनीला कोट्यावधी रूपये मिळवून दिले. ते कामगार आता देशोधडीला लागले आहे. त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे या कामगारांना शासनाने न्याय द्यावा तसेच गिमाटेक्स या कंपनीत २५०० कामगार काम करतात. या कंपनीत मागील ८ वर्षापासून निवडणूक झाली नाही. कंपनी अ‍ॅक्टप्रमाणे किमान वेतनही दिले जात नाही. व्यवस्थापन व युनियनमध्ये तीन करारनामे झाले परंतू कामगारांचे शोषण केले जात आहे. महिला कर्मचाºयांना किमान वेतन दिले जात नाही. अशी माहिती ना. जयंत पाटील यांना कामगारांनी दिली. तसेच हिंगणघाट इटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क येथील कामगारांना फॅक्ट्री अ‍ॅक्टनुसार सुविधा दिल्या जात नाही. या कंपनीच्या श्याम बाबा गारमेंट कंपनीत कामगारांना किमान वेतना प्रमाणे रक्कम दिली जात नाही. पीएफचे पैसे जमा केले नाही, १ तासाचा लंच, १ वर्षाची पगारवाढ आदी मागण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. रेडिमेड कापड तयार करण्याच्या कंपनीत २५० महिला काम करतात त्यांना विनामुल्य प्रशिक्षण दिले गेले त्यानंतर कंपनी सुरू केल्यावर ५० रूपये दिवस प्रमाणे पगार दिल्या जातो. किमान वेतन कोणालाही मिळत नाही. अशी माहिती राजु तिमांडे यांनी जयंत पाटील यांना दिली. कामगारांनी मंत्रीमहोदयांना आपल्या अडचणी सांगितल्या. मोठ्या संख्येने कामगार मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवन