शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

केळझरच्या शेतकऱ्यांना दिली दिवाळीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:54 IST

येथील ४०६ शेतकयांच्या शेतजमीनी अखेर वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये परावर्तीत करण्यात आल्या. मागील अनेक वर्षांपासून शेतकरी शासन दरबारी उंबरठे झिजवत होते. परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता याबाबत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला.

ठळक मुद्देपंकज भोयर : ४०७ शेतकऱ्यांच्या जमीनी वर्ग १ मध्ये परावर्तित

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : येथील ४०६ शेतकयांच्या शेतजमीनी अखेर वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये परावर्तीत करण्यात आल्या. मागील अनेक वर्षांपासून शेतकरी शासन दरबारी उंबरठे झिजवत होते. परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता याबाबत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला.दिवाळीच्या पर्वावर ही भेट आमदार भोयर यांनी दिली. केळझर येथील ४०६ शेतकऱ्यांच्या शेतजमीन वर्ग २ मध्ये होत्या त्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी सतत तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. परंतु हा प्रश्न निकाली निघाला नाही .शेतकऱ्यांनी ही गंभीर बाब आ. भोयर यांच्या निर्दशनास आणून दिली. आ.भोयर यांनी याबाबत तातडीने पावले उचलत तहसील कार्यालयास कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. महसूल विभागाने कार्यवाही करीत ४०६ शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये परावर्तित केल्या.सोमवारी आमदार डॉ. भोयर यांनी संबंधित शेतकऱ्यांना तसे पत्र दिले यावेळी सरपंच रेखा शेंद्रे ,जि.प. सदस्य विनोद लाखे, ग्राम पंचायत सदस्य अनिल तेलरांधे, सेलू तालुका भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष विलास वरटकर, पीरबाबा दर्गा टेकडीचे अध्यक्ष डॉ इर्शाद शेख, भाजप सर्कल प्रमुख विजय खोडे, सिद्धीविनायक देवस्थानचे अध्यक्ष माधव इरुटकर ,मंडळ अधिकारी भलावी, पटवारी राउत आदी उपस्थित होते. मंडळ अधिकारी व पटवारी यानी ३० नोव्हेंबरपर्यंत सातबारा देण्यात येईल अशी माहिती दिली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.