शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी जिरवा, मिळवा मालमत्ताकरात सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:20 IST

शहर आणि लगतच्या परिसरात दुष्काळ पडला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पाणी जमिनीत जिरवावे. जो मालमत्ताधारक पावसाचे पाणी यशस्वीपणे जमिनीत जिरवेल, त्याला पालिका वार्षिक मालमत्ता करात दोन टक्के सवलत देईल, अशी घोषणा नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केली.

ठळक मुद्देनगराध्यक्षांची घोषणा : रेन वॉटर हार्वेस्टिंगवर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहर आणि लगतच्या परिसरात दुष्काळ पडला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पाणी जमिनीत जिरवावे. जो मालमत्ताधारक पावसाचे पाणी यशस्वीपणे जमिनीत जिरवेल, त्याला पालिका वार्षिक मालमत्ता करात दोन टक्के सवलत देईल, अशी घोषणा नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केली.वर्धा शहरातील पाणीटंचाई व जमिनीतील खोल गेलेली पाण्याची पातळी या समस्येचा सामना करण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्थानिक विकास भवनात जलजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. यवतमाळ येथील जलतज्ज्ञ नितीन खर्चे, एकात्मिक पाणलोट विकास व व्यवस्थापन समिती तज्ज्ञ व तामसवाडा प्रकल्पाचे प्रणेते माधव कोटस्थाने, डॉ. सचिन पावडे प्रामुख्याने उपस्थित होते.नगर परिषदेच्या वतीने रामदास तडस यांचा खासदार म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रोजेक्टरचा वापर करून उपस्थित सर्व मान्यवरांनी वेगवेगळ्या रितीने पावसाचे पाणी कशा रितीने जमिनीत जिरवायचे ते सांगितले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नगर परिषद कर्मचारी, नगरसेवक तथा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणी हे जीवन आहे व त्याचा जपून वापर करावा, अशी प्रतिज्ञा घेत हा जल जागृती कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केले. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, पाणीपुरवठा विभागाचे सभापती सचिन पारधे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. नागरिकांनी पाण्याचे महत्त्व जाणून घेत भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे नियोजन करावे, याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.