शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ताडपत्री वितरणाने गाजली पंचायत समितीची मासिक सभा

By admin | Updated: June 20, 2014 00:01 IST

स्थानिक पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या ५० टक्के अनुदानावरील ताडपत्री वितरणात दुजाभाव होत असल्याचा आक्षेप काँग्रेसच्या पं़स़ सदस्यांनी घेतला़ नुकतीच पार पडलेली पं़स़ ची मासिक सभाही

काँगे्रस सदस्यांचा आक्षेप : २२० ताडपत्र्यांचे वितरण रखडलेकारंजा (घा़) : स्थानिक पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या ५० टक्के अनुदानावरील ताडपत्री वितरणात दुजाभाव होत असल्याचा आक्षेप काँग्रेसच्या पं़स़ सदस्यांनी घेतला़ नुकतीच पार पडलेली पं़स़ ची मासिक सभाही याच मुद्यावर गाजली़ पं़ स़ कडे उपलब्ध ताडपत्र्यांचे वाटप सत्तारुढ सदस्यांच्या मर्जीने झाले. सर्कलनुसार सम प्रमाणात वाटप होत नसल्याची लेखी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे काँग्रेसचे पं.स. सदस्य तेजराव बन्नगरे, किशोर उंकडे, संगीता खोडे, ज्योती भूतडा यांनी यापूर्वी केली होती. यावरून वाटप तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. कारंजा पं.स. सदस्यांची मासिक सभा नुकतीच पार पडली़ या सभेत अन्य विषयांसह ताडपत्री वाटपाचा मुद्दा तक्रारकर्त्या काँग्रेसच्या पं.स. सदस्यांनी उचलून धरला. ताडपत्रीचे वाटप करताना सर्व सदस्यांना समान वाटा मिळावा, सर्व सर्कलला प्रतिनिधीत्व देण्यात यावे यावर चर्चा झाली. शेवटी सभापतींनी या मुद्दावर चर्चा करून प्रत्येक सदस्याने २० जूनपर्यंत संबंधित शेतकऱ्यांकडून मागणी पत्र पंचायत समितीला कागदपत्रासह सादर करावे, केवळ यादी देऊन चालणार नाही, असा तोडगा काढला व विरोधकांना शांत केले. १२ फेब्रुवारीच्या मासिक सभेतील मंजुरीप्रमाणे कृषी विभागामार्फत शेष फंडातून २०१३-१४ करीता ६ लाख ३६ हजार रुपयांच्या ५४० ताडपत्र्या खरेदी करून ५० टक्के अनुदानावर गरजू शेतकऱ्यांना वाटप करण्याचे ठरले होते. लाभार्थ्यांना ६७६ मीटरची एक ताडपत्री ५० टक्के अनुदानावर १२०० रुपयांत मिळणार आहे़ आतापर्यंत २२० शेतकऱ्यांना योग्य कागदपत्रे दिल्यानंतर ताडपत्रींचे वाटप करण्यात आले़ उर्वरित ताडपत्र्या मासिक सभेत ठरलेल्या धोरणानुसार वितरित होणार असल्याचे कृषी अधिकारी आदेवार यांनी सांगितले. कारंजा पंचायत समितीमध्ये भाजपचे ५, काँग्रेसचे ४, राष्ट्रवादीचा १ असे १० सदस्य आहेत. प्रत्येक पं़स़ सदस्याच्या वाट्याला त्याच्या क्षेत्रात वाटण्यासाठी किमान ५० ताडपत्र्यांचा कोटा देण्यात यावा, असे आग्रही मत सदस्य तेजराव बन्नगरे यांनी मांडले. यानंतर पं.स. मार्फत वाटप करण्यात येणाऱ्या साहित्याचे समान वाटप केले जाईल, अशी अपेक्षा काँग्रेस सदस्य व्यक्त करताहेत़(तालुका प्रतिनिधी)