शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपावर रात्रीच्या तपासणीचे गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:37 IST

जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील सुविधांबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच इंडियन आॅईल कंपनीची चमू सोमवारी वर्धेत दाखल झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील सुविधांबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच इंडियन आॅईल कंपनीची चमू सोमवारी वर्धेत दाखल झाली. या चमूकडून शहरातील इंदिरा गांधी चौक परिसरात असलेल्या पंपावर तपासणी केली. ही तपासणी रात्रीला झाली. शिवाय तपासणीदरम्यान घडलेला घटनाक्रम ही केवळ दिखावा तर नाही ना, अशी शंका उपस्थित होते. रात्रीच्या या तपासणीमागे नेमके गौडबंगाल काय असा, प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल पंपावरील ११ पैकी मोजक्या सुविधांचीच माहिती नागरिकांना असल्याचे लोकमतने केलेल्या सर्व्हेत समोर आले. असे असले तरी नियमातील सर्वच सुविधा पंपावर अनिवार्य आहे. याचीच पाहणी करण्याकरिता सोमवारी ही चमू वर्धेत आली. या चमूने आरती चौकातील पेट्रोल पंपाची पाहणी केली. मात्र यावेळी रात्रीचे ८.३० वाजले होते. या अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावावर केवळ पंपाच्या परिसरात एक नजर फिरविल्याचेच दिसून आले. यानंतर ही चमू पंप मालकाच्या कॅबिनमध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती चमू बाहेर येण्याचे नाव घेत नव्हती. यामुळे या चमुने पंपाची तपासणी केली की नियमांच्या नावावर आपलचं भल करून घेतले, अशी शंका उपस्थित होत आहे. दाखल झालेल्या या चमूने पंपावर असलेल्या सुविधा नियमानुसार आहे अथवा नाही, याची पाहणी करणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून केवळ पंप मालकाची कॅबीन राखण्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले. यामुळे झालेल्या तपासणी केवळ कागदोपत्री पूर्ततेकरिता झाल्याचे दिसून आले. यामुळे कंपनी पंपावर येणाऱ्या ग्राहकांबाबत किती निष्काळजी करतात याचा प्रत्यय येतो. अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार पंपावर तपासणीकरिता आलेल्या अधिकाऱ्यांची नियम आणि सुविधांबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. पंपमालक नवनित सोमाणी यांनी मात्र होत असलेली तपासणी नियमित असल्याचे सांगितले. त्यांनी या अधिकाऱ्यांशी बोलणी घडवून देण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.