शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

गॅस सबसिडी भलत्याच बँक खात्यात

By admin | Updated: January 24, 2015 01:38 IST

केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची सबसिडी आधारमार्फत देण्याच्या योजनेला नव्याने सुरुवात केली असली तरी यामध्ये ग्राहकांना येणाऱ्या समस्याने मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

मंगेश व्यवहारे वर्धाकेंद्र सरकारने गॅस सिलिंडरची सबसिडी आधारमार्फत देण्याच्या योजनेला नव्याने सुरुवात केली असली तरी यामध्ये ग्राहकांना येणाऱ्या समस्याने मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. ग्राहकांना गॅससिलिंडर घरपोच मिळत असले तरी सबसिडी मात्र भलत्याच बँक खात्यात जमा होत असल्यामुळे या डोकेदुखीपायी ग्राहक बेजार झाले आहे.याबाबत बँकांशी संपर्क साधला असता शासनाच्या सरवरमध्ये अडचणी येत असल्यामुळे हा घोळ सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दिवसागणिक या तक्रारींची संख्या वाढत असल्याचीही माहिती यावेळी मिळाली.काँग्रेस आघाडी सरकारने आधार योजना अंमलात आणली. त्यावेळी विरोधकाची भूमिका बजावत असलेल्या भाजपाने या योजनेला कमालीचा विरोध दर्शविला होता; मात्र केंद्रात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर जुने ते सोने याचा साक्षात्कार त्यांना झाला की काय नोव्हेंबर २०१४ पासून पुन्हा गॅससिलिंडरची सबसिडी आधारमार्फत बँकांच्या खात्यात जमा कररणे सुरू केले. हे करताना आधी ग्राहकांना मानसिक त्रास आणि आगाऊ भुर्दंड बसणार नाही, याचा शोध घेऊन ही समस्या निकाली काढणे अनिवार्य होते. मात्र सरसकट योजना ग्राहकांच्या डोक्याचा ताण वाढविणारी ठरली. ग्राहकांकडून कंपनीकडे आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर अल्पावधीत गॅस सिलिंडर घरपोच येते. पूर्ण किंमत मोजून ते घ्यावे लागते. यानंतर सबसिडी जमा झाल्याचा एसएमएस येतो. मात्र ती भलत्याच बँक खात्यात जमा होत असल्याचे पुढे आले आहे. याची चौकशी करण्यासाठी ग्राहक संबंधित कार्यालयाकडे चकरा मारतात; मात्र त्याला योग्य प्रतिसाद मिळत नाही. यामुळे तो वैतागून या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. वर्धेत सुमारे १६० विविध बँकांच्या शाखा आहेत. यापैकी कुठल्याही खात्यात ही रक्कम जमा होत आहे. यामुळे ग्राहक कमालीचा त्रस्त झाला. ग्रामीण भागात ही समस्या बिकट बनलेली आहे. असंख्य ग्राहकांना या समस्येला नाहक सामोरे जावे लागत आहे. असा झाला घोळकाँग्रेस आघाडी सरकारने १ जून २०१३ रोजी पहिल्यांदा आधारअंतर्गत सबसिडी ग्राहकांच्या वा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना अंमलात आणली. मात्र अनेकांचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक लिंक न झाल्यामुळे अनेकांना गॅससिलिंडरच्या सबसिडीपासून वंचित राहावे लागले. सोबतच अन्य तक्रारींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. यामुळे जनतेमध्ये सरकारबाबत चुकीचा संदेश गेल्यामुळे फेब्रुवारी २०१४ मध्ये ही योजना बंद करून गॅस सिंलिंडर घेतानाच सबसिडीची रक्कम कपात करुन सिलिंडर मिळू लागला. केंद्रात सत्तांतर झाले. भाजप सरकार स्थापन झाले. यानंतर या सरकारने पुन्हा नोव्हेंबर २०१४ पासून ही योजना सुरू केली. ही योजना पुन्हा आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास देईल, या भीतीने गॅस सिलिंडर ग्राहकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आणि झालेही तसेच. जिल्ह्यात सुमारे अडीच लाखांच्या घरात गॅस सिलिंडरचे ग्राहक आहे. आजघडीला अनेकांनी आधार क्रमांकासह बँक खात्याचा क्रमांक सिलिंडर क्रमांकाशी जोडला आहे. यानुसार सिलिंडर उपलब्ध होत आहे. मात्र सबसिंडीची रक्कमच दिलेल्या खात्यात जमा होत नसल्याचा फटका अनेकांना बसत आहेही योजना सुरू केली तेव्हा आधार नोंदणीही सुरू होती. योजना सुरू होताच ज्या ग्राहकांनी नोंदणी केली. आधार नोंदणी केंद्रामार्फत त्यांचे नोंदणीपत्र मागवून आॅनलाईन त्यांचे बँक क्रमांक शोधण्यात आले. हे करताना पूर्ण नावाचा आधार न घेता केवळ नाव वा आडनाव हे गृहीत धरून त्यापुढे आलेल्या बँक क्रमांकाला सदर ग्राहकाच्या नावावर लावले गेले. यामुळे अनेकांच्या नावासमोर चुकीचे बँक क्रमांक जोडल्यामुळे खरा घोळ झाला. त्याची दुरुस्ती आता ग्राहकांच्या तक्रारीनुसार करण्याचा खटाटोप बँक आणि सरकारला करावा लागत आहे.