शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वेतनाकरिता टाकला रस्त्यावर कचरा

By admin | Updated: June 2, 2017 02:04 IST

नगर परिषदेंतर्गत सफाई कंत्राटदाराचे कामगारांनी एक महिन्याचा पगार अद्याप मिळाला नाही.

सफाई कामगारांचे आंदोलन : नालीतील घाण रस्त्यावर लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नगर परिषदेंतर्गत सफाई कंत्राटदाराचे कामगारांनी एक महिन्याचा पगार अद्याप मिळाला नाही. या कारणामुळे संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी संत तुकडोजी वॉर्डातील राष्ट्रीय महामार्गावरील नंदोरी चौक व मॉ शेरावाली चौकातील रस्त्यावर घाण टाकून आपल्या समस्येकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. शेवटी नगर परिषद प्रशासनाने या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून मे महिन्याचे वेतन ६ जूनला देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी टाकलेला कचरा उचलून नेला.शहरातील नवीन वस्तीच्या आठ वॉर्डाच्या साफसफाईचा कंत्राट स्थानिक कल्याण कंस्ट्रक्शनला तीन वर्षांपासून दिला आहे. या कंत्राटाची मुदत ३१ मार्चला संपली असून नवीन कंत्राट चंद्रपूरच्या एजन्सीला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान एप्रिल व मे महिन्याचे सफाई काम जुन्या कंत्राटदाराला सोपविले होते. या कामांचे देयक संबंधीत कंत्राटदाराला दरमहिन्याचे २० तारखेला देण्यात येते; परंतु एप्रिल महिन्याचे देयक देण्यास १० दिवस विलंब झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या कंत्राटी कामगारांनी घाण कचरा रस्त्यावर टाकून आपली समस्या चव्हाट्यावर आणली; मात्र याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला.या प्रकाराची माहिती मिळताच पालिकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, नगरसेवक सतीश धोबे, निलेश तुळसकर, निलेश पोगले, राजू कामडी, आशिष पर्बत, न.पा. मुख्याधिकारी अनिल जगताप, स्वास्थ निरीक्षक खोब्रागडे, चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेवून प्रकाराची पाहणी केली. यावेळी त्यांनी कंत्राटदार गजानन राऊत व सफाई कमगारांशी चर्चा करून ३० मे रोजी कंत्राटदाराला दिलेल्या धनोदशद्वारा एप्रिल महिन्याचे वेतन आज देण्याचे तसेच मे महिन्याचे वेतन ६ जूनला देण्याचे नगर पालिका प्रशासनाने आश्वासन दिले. त्यानंतर या कामगारांनी टाकलेला कचरा उचलून नेवून मार्ग पूर्ववत केला.एप्रिल महिन्याच्या कामाचे देयक कंत्राटदाराला ३० मे रोजी धनादेशाद्वारे देण्यात आले. मे महिन्याचे देयक काढण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कामगारांचे आंदोलन चुकीचे आहे.- अनिल जगताप, मुख्याधिकारी, न.पा. हिंगणघाट