शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींमधून निघतो गांजाचा धूर

By admin | Updated: December 21, 2014 23:05 IST

शहरात अवैध व्यवसायांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ दारूबंदी असताना जिल्ह्यात राजरोसपणे दारू विकली जाते. सोबतच परजिल्ह्यांतून शहरात गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते़ यामुळेच शहरातील

वर्धा : शहरात अवैध व्यवसायांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ दारूबंदी असताना जिल्ह्यात राजरोसपणे दारू विकली जाते. सोबतच परजिल्ह्यांतून शहरात गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते़ यामुळेच शहरातील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींमधून रात्रीच्या सुमारास गांजाचा धूर निघत असल्याचे दिसून येते़ पोलीस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शौकिनांचे चांगलेच फावत असल्याचे दिसते़महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे वास्तव्य राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली तरी शहरापासून, गावखेड्यांपर्यंत खुलेआम दारूविक्री सुरू आहे. दारूसोबतच आता गांजाविक्रीचे प्रमाण वाढल्याने युवक व्यवनाच्या आहारी जात आहे. सध्या शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री सुरू आहे. छुप्या मार्गाने गांजाची विक्री केली जाते़ गांजाचे व्यसन जडलेली व्यक्ती दररोज गांजा ओढल्याशिवाय राहू शकत नाही़ यामुळे गांजा मिळविण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला जातो. महाविद्यालयीन तरूणही या व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सायंकाळ होताच निर्जन स्थळी सदर शौकिन युवक गोळा होतात आणि मनसोक्त गांजा ओढतात. शहरातील अनेक इमारतींचे बांधकाम अर्धवट झालेले आहे. या इमारतींमध्ये सध्या अवैध व्यवसायांना उधाण आल्याचे दिसून येते़ ठाकरे मार्केटमध्ये असलेल्या नाट्यसभागृहात सायंकाळच्या सुमारास मद्यपिंचा धुमाकूळ असतो. या ठिकाणी पोलीस फिरकूनही पाहत नसल्याने मद्यपि मनसोक्त दारू रिचवत असून गांजाचे धूरसुद्धा निघताना दिसतात. अनेक तरूण सिगारेटमधील तंबाखू काढून त्यात गांजा भरून ओढतात.शहरातील इतवारा चौक, पुलफैल, तारफैल, स्टेशनफैल, बोरगाव (मेघे), देवळी बायपास व शहरातील खिंडार इमारतींमधूनही गांजाचा धूर निघताना दिसतो. पोलीस प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे़ पवनार येथील धामनदीच्या परिसरात मोकळ्या वातावरणात भरदिवसा युवक गांजा ओढताना दिसून येतात़ या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त राहत नसल्याने अवैध व्यवसाय सुरू आहे़ पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)