शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

विचाराधीन मॉलसाठी पार्किंगवर गंडांतर

By admin | Updated: April 28, 2015 01:57 IST

रेल्वे स्थानकावर प्रवासी तसेच अप-डाऊन करणाऱ्या नोकरदार वर्गाकरिता पार्किंगची व्यवस्था केली जाते़ कित्येक

रेल्वे प्रशासनाचा प्रताप : शेडची व्यवस्था करून न देताच वाहनांचे स्थलांतर; प्रवाश्यांना फेरावर्धा : रेल्वे स्थानकावर प्रवासी तसेच अप-डाऊन करणाऱ्या नोकरदार वर्गाकरिता पार्किंगची व्यवस्था केली जाते़ कित्येक वर्षांपासून ही पार्किंग व्यवस्था रेल्वे पोलीस ठाण्याच्या बाजूला करण्यात आलेली होती़ मोकळी व ऐसपैस जागा असल्याने वाहनेही व्यवस्थित राहत होती; पण मॉलच्या नावाखाली ही जागा मोकळी करून घेण्यात आली आहे़ यामुळे वाहन धारक प्रवाश्यांना रेल्वेस्थानकाच्या बाहेर निघून वाहने काढण्यासाठी जावे लागते़ या धावपळीत गाडी निघून जात असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत़ सध्या रेल्वेची पार्किंग व्यवस्था पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस हलविण्यात आली आहे़ या परिसरात जाण्याकरिता रस्त्याची निर्मितीही करण्यात आली नाही़ हा परिसर महिला, युवतींकरिताही सुरक्षित नाही़ रात्रीच्या सुमारास रस्त्यावर रिक्षा चालकांसह मद्यपिंची धूम असते़ शिवाय विविध खाद्यपदार्थांच्या बंड्या लागत असल्याने प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागतो़ कचऱ्याचे उकिरडे असून पोलिसांच्या नजरेपासून दूर असलेला हा परिसर त्रासदायक ठरणारा आहे़ रेल्वे प्रशासन पार्किंगचे कंत्राट देताना लाखो रुपये वसूल केले जातात; पण पार्किंगकरिता विशेष सुविधा पुरविल्या जात नाहीत़ या प्रकारामुळे प्रवासीही त्रस्त झाले आहेत़ पूर्वी पार्किंग व्यवस्था जवळ असल्याने गाडीच्या वेळेवर पोहोचलेल्या प्रवाश्यांना ती पकडता येत होती; पण आता हातचे काम सोडून वेळेपूर्वी रेल्वे स्थानकावर पोहोचावे लागत असल्याने तारांबळ उडताना दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)शेड नसलेल्या पार्किंग व्यवस्थेने अडचण; तिकीट घराजवळील फाटकालाही असते कुलूपगत कित्येक वर्षांपासून रेल्वे पोलीस ठाण्याच्या शेजारी पार्किंग व्यवस्था होती़ त्या परिसरात शेडचे बांधकामही करण्यात आलेले आहे़ यामुळे वाहन सुरक्षीत राहू शकत होते; पण नवीन स्थलांतरीत जागेवर कुठलीही शेडची व्यवस्था करण्यात आलेली नाही़ यामुळे वाहने दिवसभर उन्हातच असतात़ यात वाहनांचे नुकसान होत आहे़ शिवाय जागाही पूर्वीपेक्षा कमी आणि तोकडी असल्याने वाहने ठेवण्याकरिता जागा राहत नाही़ महिला, युवतींना आपली वाहने हाती धरून आधी जागा शोधत फिरावे लागते़ या प्रकारामुळेही गाडी पकडताना धावपळ करावी लागत असल्याचे दिसते़ शिवाय पेट्रोल पंपाच्या भिंतीलगत रस्त्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात़ यामुळे या वाहनांकडे कुणाचेही लक्ष राहत नाही़ संबंधित कंत्राटदाराने आपल्यापूरते लहान शेड केले; पण त्यातून संपूर्ण वाहनांकडे लक्ष देणे त्यांनाही शक्य होत नाही़ यामुळे शेडची निर्मिती करावी, अशी मागणी वाहन धारकांतून होत आहे़ नवीन पार्किंग स्थळाकडे येण्यासाठी फलाटावरून कुठलाही रस्ता ठेवण्यात आलेला नाही़ तिकीटघराजवळ एक फाटक आहे़ याद्वारे रेल्वेच्या तांत्रिक विभागाकडे जाता येते व येथूनच पार्किंगचे नवीन स्थळही जवळ आहे; पण सदर फाटक नेहमी बंद ठेवले जाते़ या फाटकाला कुलूपबंद ठेवण्यामागील कारण काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे़ तिकीटघराबाहेर कर्मचाऱ्यांना वाहने ठेवण्यासाठी जागा दिली आहे़ जबाबदारी कुणाची ?रेल्वे प्रशासनाच्या पार्किंगचे कंत्राट लाखोर रुपयांचे असते; पण तेथे सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जाते़ ही जबाबदारी संबधित कंत्राटदाराची की रेल्वे प्रशासनाची, हा प्रश्नच आहे़ शेड नाही, पिण्याचे पाणी नाही आणि वाहन ठेवण्याकरिता पूरेसी जागाही नसल्याने प्रवाश्यांची तारांबळ उडत असल्याचे दिसते़