पोलिसांची धाड : सहा जणांना अटक; १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तकारंजा (घाडगे): तालुक्यातील ठाणेगावचे ग्रामपंचायत सदस्य आशिष कडवे याच्या घरी सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड घातली. यात सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईत १४ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. पोलीस सुत्रानुसाार, आशिष कडवे याच्या घरी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी कडवे याच्या घरी धाड टाकली असता आशिष कडवेचे वडील उत्तम कडवे (५०), देवेंद्र ठाकरे, (१९), कुंतेश्वर सहारे (३०), विनोद हजारे (२२), यादव ठाकरे (२६), काटेश्वर नेहारे या सहा जण ताशपत्त्यावर जुगार खेळत असताना दिसून आले. त्यांच्यावर पोलिसांनी जुगार कायद्यांतर्गत अटक असून या कारवाईत रोख ९ हजार ५८० रुपये व तीन मोबाईल असा एकूण १४ हजार १२५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उत्तम कडवे यांचा येथे दारुविक्रीचाही व्यवसाय असल्याची चर्चा आहे. (शहर प्रतिनिधी)
ग्रा.पं सदस्याच्या घरी जुगार
By admin | Updated: July 26, 2014 02:39 IST