शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

फरार जावयाला चार महिन्यांनी मुंबईत अटक

By admin | Updated: August 27, 2016 00:28 IST

मोठ्या साळ्याची चाकूचे वार करून हत्या करणाऱ्या तसेच पत्नी व लहान साळ्याला गंभीररित्या जखमी करणाऱ्या आरोपीला तब्बल सव्वाचार महिन्यानंतर

शहर पोलिसांची कारवाई : रेल्वे पुलाखाली लपविला होता चाकूवर्धा : मोठ्या साळ्याची चाकूचे वार करून हत्या करणाऱ्या तसेच पत्नी व लहान साळ्याला गंभीररित्या जखमी करणाऱ्या आरोपीला तब्बल सव्वाचार महिन्यानंतर बुधवारी मुंबई येथून ताब्यात घेण्यात शहर पोलिसांना यश आले. राजेश उर्फ राजू चंद्रकांत भगत असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला रात्रीच वर्ध्यात आणून न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली. हत्या करण्याकरिता वापरलेला चाकू त्याने रेल्वे पूलाखाली दडवून ठेवल्याची कबुली दिली असून पोलिसांनीही तो जप्त केला आहे.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली माला राजू भगत व तिचा भाऊ नरेंद्र यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. मुंबईचा रहिवासी राजू भगत याचा वर्धा येथील समतानगर भागात राहणाऱ्या माला मारोतराव कांबळे हिच्याशी विवाह झाला होता. राजू हा शंकाखोर स्वभावाचा असल्यामुळे माला हिला नेहमीच त्रास द्यायचा. त्यामुळे ती मुलीला घेऊन वर्ध्याला निघून आली. त्यानंतर दोन ते तीन वेळा राजू पत्नीला घेण्याकरिता वर्ध्याला आला. पण पत्नीने सोबत येण्यास नकार दिला. १६ एप्रिलला तो पुन्हा वर्ध्यात आला असता पत्नी मालाने सोबत येण्याची तयारी दर्शविली, मात्र आधी बैठक घेण्याची अट घातली. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात राजूने मालाचा मोठा भाऊ देवानंद मारोतराव कांबळे (४०) यांच्या पोटावर चाकूचे वार केले. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी त्याने लहान साळा नरेंद्र याच्यावरही चाकूने वार केले. यात तोही गंभीर जखमी झाला. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनेपासून फरार असालेल्या राजूचा शोध सुरू होता. राजू सतत स्थळ बदलवित कधी गुजरात, कधी हैदराबाद, कधी उत्तरप्रदेश तर कधी मुंबई असा तो फिरत होता. वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून पत्नी माला व साळा नरेंद्रशी संपर्क साधून धमकी देत होता. हाच धागा पकडून ठाणेदार शिरतोडे यांनी आरोपीला मुंबई पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मुंबईच्या मानखुदृ भागात अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चंदू खोंड, जमादार प्रमोद जांभुळकर, श्रीकांत खडसे, सचिन वाटखेडे, धुर्वे यांच्या चमूने केली.(प्रतिनिधी)