शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कड्याळूच्या मुळ्या खाल्ल्याने चार गाई दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:16 IST

कड्याळू चाऱ्याच्या मुळ्या खाल्ल्याने चार गार्इंचा मृत्यू झाला. तर दहा गार्इंची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे विरुळ (आकाजी) परिसरात एकच खळबळ उडाली असून नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे. प्रकृती गंभीर असलेल्या जनावरांवर उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देविरुळ गावात खळबळ : दहा गार्इंची प्रकृती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : कड्याळू चाऱ्याच्या मुळ्या खाल्ल्याने चार गार्इंचा मृत्यू झाला. तर दहा गार्इंची प्रकृती खालावल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे विरुळ (आकाजी) परिसरात एकच खळबळ उडाली असून नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देण्याची मागणी आहे. प्रकृती गंभीर असलेल्या जनावरांवर उपचार सुरू आहे.सध्या या भागातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे हा प्रसंग पशुपालकांवर ओढवला आहे. अशातच चारा टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असलेल्या गावातील पशुपालकांच्या गाई जंगलात चरण्यासाठी नेण्यात आल्या होत्या. दरम्यान, या गार्इंनी कढाऊ पिकाच्या मुळ्या खाल्ल्या. यातच त्यांना विषबाधा होत त्यांची प्रकृती खालावण्यास सुरूवात झाली. यात चार गार्इंचा तडफडून मृत्यू झाला तर इतर जनावरांची प्रकृती खालावल्याने जनावरांना विषबाधा झाल्याचे पशुपालकांच्या निदर्शनास आले. तातडीने पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पराते यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून प्रकृती खालावलेल्या जनावरांवर उपचार सुरू केला. त्यांच्या प्रयत्नामुळे सहा गार्इंचे प्राण बचावले. तर सहा गार्इंची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सुनील सालंकार यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत जनावरांसाठी घटनास्थळीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकरच्या माध्यमातून केली होती.ज्वारीचे मूळ खाणे बेतले जीवावरखरांगणा (मो.) - परिसरातील पशुपालकांना वैरण टंचाईच्या झळा सध्या सहन कराव्या लागत आहे. याच पार्श्वभूमीवर चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांनी ज्वारीचे मूळ खाल्ल्याने पाच गार्इंचा मृत्यू झाला. तर १५ गार्इंची प्रकृती खालविली. ही घटना नजीकच्या दहेगाव (गोंडी) शेत शिवारात घडली. या घटनेमुळे पशुपालक राजाभाऊ देशमुख यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, दहेगाव (गोंडी) येथील राजाभाऊ देशमुख यांच्याकडे एकूण २० गाई आहेत. सोमवारी त्यांच्याकडे कामावर असलेल्या गड्याने सदर जनावरे जंगलाच्या दिशेने चारण्यासाठी नेली. दरम्यान, जनावरांनी शेत शिवारात असलेल्या ज्वारी पिकाच्या मुळ्या खाल्ल्या. काही वेळानंतर जनावरांची प्रकृती खालावण्यास सुरूवात झाल्याने त्याने घटनेची माहिती तातडीने राजाभाऊ देशमुख यांना दिली. त्यांनी तातडीने दहेगाव (गोंडी) येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाºयांनी घटनास्थळ गाठून प्रकृती खालावलेल्या जनावरांची पाहणी केली असता पाच जनावरे दगावल्याचे निदर्शनास आले. तर उर्वरित १५ जनावरांना औषधोपचार सुरू केला. या घटनेमुळे पशुपालक राजाभाऊ देशमुख यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.