शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूल बांधकामात अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:11 IST

शहरातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपूलाचे रूंदीकरण हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कित्येक वर्षांच्या मागणीनंतर या पुलाच्या रूंदीकरण कामास प्रारंभ झाला; ...

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपूलाचे रूंदीकरण हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कित्येक वर्षांच्या मागणीनंतर या पुलाच्या रूंदीकरण कामास प्रारंभ झाला; पण या बांधकामात अडथळ्यांची शर्यतच असल्याचे दितसे. परिणामी, कामाचा वेग मंदावला आहे. अडथळ्यांमुळे उड्डाणपुलाचे बांधकाम आठ महिने झाले असताना संथगतीनेच सुरू आहे. यामुळे मुदतीत पुलाचे रूंदीकरण होणार काय, हा प्रश्नच आहे. वाहनांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल रहदारीसाठी अपुरा ठरत आहे. या पुलावर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होतो. उड्डाणपुलाचे रूंदीकरण करण्याची मागणी कित्येक वर्षांपासून खितपत होती. अखेर मंजुरी मिळाली आणि आॅक्टोबर २०१६ मध्ये कामाला सुरूवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याला आठ महिन्यांचा कालावधी लोटला; पण कामाला गती आली नाही. बांधकाम विभागाकडून केवळ आजुबाजुला भिंंती बांधण्यात आल्या तर बोरगाव व सावंगी मार्गावर सिमेंटचे अर्धवट रस्ते बांधण्यात आले. नगर पालिका व महावितरण कंपनीकडून सहकार्य मिळत नसल्याची ओरड बांधकाम विभागही गप्प बसल्याचे दिसते. अतिक्रमणाचीही मोठी समस्या असल्याचे चित्र आहे. काही नगरसेवक व स्वयंघोषीत लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांच्या नावाचा वापर करून दबाब टाकत असल्याची चर्चा आहे. उड्डाणपूल निर्मितीमध्ये समस्यांचा डोंगर वाढत आहे. बांधकामासाठी केवळ २४ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. आठ महिने लोटल्याने उर्वरित मुदतीत काम पूर्ण कसे होणार, हा प्रश्नच आहे.