शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या मतदानामुळे तरुणांत उत्साह

By admin | Updated: February 5, 2017 00:37 IST

जि.प. मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क प्राप्त

निवडणूक रणसंग्राम : १४ हजार मतदार ठरविणार भाग्य अविनाश वाघ   पोहणा (पिपरी) जि.प. मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क प्राप्त होत असल्याने विशेषत: तरूणांमध्ये उत्साह संचारला आहे. शिवाय रिंगणातील नवीन चेहऱ्यांमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. पोहणा जि.प. मतदार संघात १८ गावांचा समावेश असून १४ हजार ७५ मतदार आहेत. यापैकी ७ हजार २७३ पुरूष तर ६ हजार ८०२ स्त्री मतदार आहेत. जि.प. गट हा सर्वसाधारण आरक्षित असून पोहणा पं.स. गण इतर मागास वर्गीयसाठी तर पिपरी पं.स. गण अनु. जमाती महिला राखीव आहे. पोहणा पं.स. गणात एकूण ६ हजार ७५० मतदार असून ३ हजार ४६० पुरूष तर ३ हजार २९० स्त्री मतदार आहे. या गणात पोहणा, बोपापूर, येरला, डोरला, हिवरा, भिवापूर व गंगापूर या सात गावांचा समावेश आहे. पिपरी पं.स. गणात ७ हजार ३२५ मतदार असून ३ हजार ८१३ पुरूष व ३ हजार ५१२ स्त्री मतदारांचा समावेश आहे. या गणात पिपरी, वेणी, सेलू, धानोरा, खेकडी, कोल्ही, सावंगी, ढिवरीपिपरी, सास्ती, हडस्ती व धोची ही अकरा गावे आहेत. पोहणा जि.प. गट जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची मतदार संघाला लागलेली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजला जाणारा हा गट काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता; पण गत निवडणुकीत या गडाला खिंडार पडले. पहिल्यांदाच भाजपने बाजी मारली. यंदा सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार दिल्याने येथे बहुरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.