शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर दाम्पत्याची ‘आस्था’ ठरली प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:58 IST

दहावी सीबीएसईच्या परीक्षेत डॉक्टर दाम्पत्याची आस्था बकाने हिने ९८.६० टक्के गुण संपादिता करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर हिंगणघाट सिया मानधनिया व वर्धेच्या आदित्य डोर्लीकर या दोघांनी ९७.८ टक्के गुण मिळाल्याने ते द्वितीय स्थानी राहिले. तर कौस्मिन गोटे हा ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय आला आहे.

ठळक मुद्देदहावी सीबीएसई परीक्षेत सिया व आदित्य द्वितीय!

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दहावी सीबीएसईच्या परीक्षेत डॉक्टर दाम्पत्याची आस्था बकाने हिने ९८.६० टक्के गुण संपादिता करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर हिंगणघाट सिया मानधनिया व वर्धेच्या आदित्य डोर्लीकर या दोघांनी ९७.८ टक्के गुण मिळाल्याने ते द्वितीय स्थानी राहिले. तर कौस्मिन गोटे हा ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय आला आहे.दहावी सीबीएसई परीक्षेत भुगाव येथील भवन्स् लॉयड्स विद्यालयातील आस्था बकाने हिने ९८.६० टक्के गुण घेतले. ती शाळेतून प्रथम आली आहे. तर आदित्य डोर्लीकर याने ९७.८ टक्के व कौस्मिन गोटे यांने ९७ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकाविला आहे. सेलूकाटे येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील विद्यार्थी फैझान अब्दुल शेख याने ९६.८ टक्के तर आस्था डबले हिने ९६.६ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम व द्वितीय येण्याचा मान पटकाविला आहे.स्कूल आॅफ स्कॉलर शाळेतील गॉडवीन शेलॉम याने ९६.०० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा बहूमान पटकाविला. अग्रगामी कॉन्व्हेंट स्कूल म्हसाळा या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. येथे ९६ विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईची परीक्षा देत घवघवीत यश संपादीत केले आहे. या शाळेतील रितू कृपलानी ९६ टक्के गुण घेत प्रथक आला आहे.न्यू इंग्लिश अ‍ॅकडमी आॅफ जिनीयस वर्धाच्या विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईच्या परीक्षेत धवघवीत यश संपादीत केले आहे. या शाळेतील विधी डेकाटे हिने ९६.८ टक्के, नेहा वरघने हिने ९४.२ टक्के, मृनाल येऊलकर याने ९४.२ टक्के व श्रेया कावरे हिने ९२.२ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान प्राप्त केले.जय महाकाली शिक्षण संस्थाद्वारा संचालीत गांधी सिटी पब्लिक स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी पास झाले. येथील राधा महेश तेलरांधे हिने ९६.४ टक्के गुण घेत शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला. या शाळेतील १२६ विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईची परीक्षा देत घवघवीत यश संपादीत केले. चन्नावार ई विद्या मंदिरचा निकाल १०० टक्के लागला असून रोहन राठी याने ९३.६ टक्के, विनय कोकाटे ९३.००, भाविक अरोरा ९२.६ टक्के गुण घेऊन अनुक्रमे शाळेतून द्वितीय व तृतीय आले आहे.हिंगणघाट येथील गिरधारीलाल मोहता विद्या मंदिरचा निकाल १०० टक्के लागला आहे. येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले आहे. सीया मानधनिया हिने ९७.८ टक्के, इशान हिवंज याने ९६.६ टक्के तर गौरी टिबडेवाल हिने ९६.२ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकाविला. तर येथीलच सेंट जॉन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. येथील विद्यार्थी देवयानी हनोते याने ९६ टक्के, हिमांशु मुडे, ९५.८ टक्के तर यशश्री कुकडे हिने ९५ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकाविला आहे.पुलगाव येथील गांधी सिटी पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. असे असले तरी येथीलच केंद्रीय विद्यालयाची रुचा दिघडे हिने ९५.६ टक्के गुण घेऊन तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. केंद्रीय विद्यालयातील ६७ विद्यार्थ्यांपैकी ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यालयातील शक्ती झांझरी ९४.४ टक्के, अनुज महेश चौधरी ९३.२ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत. तर गांधी सिटी पब्लिक स्कूल मधील श्रद्धा सिदुरकर हिने ९५ टक्के, वरूण धामोडे याने ९२ टक्के, अनुष्का पाटणी हिने ९१ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान पटकाविले आहे.आर्वीच्या तपस्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईच्या परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले. अनुज भटकर हा शाळेतून पहिला आला आहे. तर द्वितीय स्थानी समान गुण घेऊन रोहण वानखेडे व प्रथमेश काटकर राहिला. तसेच ९२ टक्के गुण घेऊन संकेत अघम हा तृतीय स्थानी राहिला आहे. एकूणच दहावी सीबीएसई दहावीच्या निकालात जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान मुलीने पटकाविला आहे.