शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी विद्यालयाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:56 IST

स्थानिक वर्धा बस स्थानक शेजारी असलेल्या महात्मा गांधी विद्यालय तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाला सोमवारी २ वाजताच्या सुमारास अचानक लागली. यात तीन वर्गखोल्यांसह भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील साहित्य जळून कोळसा झाले. ही शाळा जि.प. प्रशासनाच्या मालकीची असून सदर घटनेमुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देभौतिकशास्त्र प्रयोगशाळेसह वर्गखोल्यांतील साहित्य जळून कोळसा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक वर्धा बस स्थानक शेजारी असलेल्या महात्मा गांधी विद्यालय तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाला सोमवारी २ वाजताच्या सुमारास अचानक लागली. यात तीन वर्गखोल्यांसह भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील साहित्य जळून कोळसा झाले. ही शाळा जि.प. प्रशासनाच्या मालकीची असून सदर घटनेमुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, दुपारी भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनेची माहिती पोलीस विभागासह नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. शिवाय आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले; पण तोपर्यंत संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाले. या आगीत भौतिकशास्त्र प्रयोग शाळा, महात्मा गांधी विद्यालयाच्या तीन वर्ग खोल्या व एका स्वयंपाक खोलीतील साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे सुमारे ५ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी घटनास्थळ गाठले होते.महात्मा गांधी विद्यालयाला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जि.प.अध्यक्ष नितीन मडावी व मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आगीची माहिती मिळताच जि.प. अध्यक्ष मडावी, शिक्षण व आरोग्य समिती सभापती जयश्री गफाट, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. ओंबासे आदींनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. प्रयोगशाळा व इतर साहित्य जळाल्याने सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्व ग्रा.पं., शाळा तसेच जिल्हास्तरीय व पंचायत समितीस्तरीय कार्यालयातील दस्तऐवज सुरक्षित राहावा या दृष्टीने उपाययोजना करण्याचाही सूचना केल्या आहेत.