शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

अखेर शरद देशमुख यांचे सभासदत्व रद्द

By admin | Updated: June 25, 2016 02:10 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाचा शरद देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात येत ...

वर्धा कृउबा समितीतील प्रकरण : जिल्हा उपनिबंधकांनी दिला निर्णय वर्धा : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाचा शरद देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा उपनिबंधकांनी बुधवारी पारीत केला आहे. त्याची प्रत बाजार समितीला शुक्रवारी देण्यात आली. त्यांनी हा निर्णय महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अनिनियम १९६३ चे कलम १७ व नियम १९६७ च्या ४१ (३) तसेच कृषी व सहकार मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार दिला आहे. सभापती असताना शरद देशमुख यांच्या विरोधात कामात हयगय करणे, गैरवर्तन करणे आदी कारणे काढत १८ मे २०१६ च्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला. या सभेला स्वत: शरद देशमुख हजर होते. त्यांनीही या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या या ठरावाच्या बाजूने असलेल्या १५ सदस्यांनी तो उपनिबंधक कार्यालयात सादर केला. या ठरावावर चौकशी सुरू असतानाच शरद देशमुख यांना सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या राजीनाम्यानंतर सभापतीचा प्रभार पांडुरंग देशमुख यांना सोपविण्यात आला. शरद देशमुख यांच्यावर असलेल्या आरोपामुळे त्यांचे सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी समितीच्या सभासदांकडून करण्यात आली. या संदर्भात उपनिबंधक कार्यालयाकडून चौकशी केली असता शरद देशमुख यांच्यावर असलेले आरोप सिद्ध झाल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा आदेश उपनिबंधकांनी पारित केला.(प्रतिनिधी)