शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

By admin | Updated: September 7, 2016 01:03 IST

समुद्रपूर तहसील कार्यालयातील वाहनाच्या मूळ लॉगबुकची झेरॉक्स मिळण्याबाबत प्रवीण भेले यांनी माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज केला होता.

माहिती आयोगाच्या सूचना : समुद्रपूर तहसीलमधील लॉगबुक गहाळ प्रकरणसमुद्रपूर : समुद्रपूर तहसील कार्यालयातील वाहनाच्या मूळ लॉगबुकची झेरॉक्स मिळण्याबाबत प्रवीण भेले यांनी माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज केला होता. विहित कालावधी पूर्ण होऊनही संबंधित कागदपत्र उपलब्ध करून न दिल्याने दोषी कर्मचाऱ्यांवर तहसीलदारांनी गुन्हा दाखल करावा, असा आदेश राज्य माहिती आयोगाने दिला आहे. या संदर्भात मंगळवारी नायब तहसीलदार सूर्यवंशी यांनी या प्रकरणाशी संबधीत चारही कर्मचाऱ्यांची सुनावणी ठेवली होती. या सुनावनीला तीनच कर्मचारी उपस्थित झाले. चौथा कर्मचारी आला नाही. यामुळे या चारही कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकूण या संदर्भात चौकशी करूनच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदारांनी सांगितले. झालेल्या सुनावणीत या कर्मचाऱ्यांनी काय उत्तरे दिली, हे सांगण्यास मात्र नकार देण्यात आला. समुद्रपूर तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या अधिनस्थ असलेल्या वाहनाचे मूळ लॉगबुक झेरॉक्स उपलब्ध करून देण्याचा अर्ज हिंगणघाट येथील प्रवीण भेले यांनी माहिती अधिकारांतर्गत १६ जानेवारी २०१६ रोजी सादर केला होता. कालावधी संपूनही ही माहिती भेले यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी राज्य माहिती आयोगाकडे दाद मागितली. सुनावणीदरम्यान नायब तहसीलदार एच.एम. अरगेलवार यांनी बाजू मांडताना कनिष्ठ लिपिक रेखा मून, वाहनचालक राजू आखाडे, कारकून खातदेव, कनिष्ठ लिपिक मनोज वंजारी यांच्यासोबत झालेला पत्रव्यवहार आयोगासमोर सादर केला. त्यामध्ये २०१० ते २०१५ पर्यंत तहसील कार्यालयाच्या अधिनस्त असणाऱ्या वाहनाचे लॉगबुक गहाळ झाल्याचे मान्य केले. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याचा भंग झाला, असा ठपका ठेवून महाराष्ट्र अभिलेख अधिनियम २००५ मधील कलम ९ अनुसार संबंधित सर्व दोषी कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचा आदेश राज्य माहिती आयोगाने १९ आॅगस्टला जारी केला आहे, अशी माहिती प्रवीण भेले यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली. (तालुका प्रतिनिधी)