शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पोलीस ठाण्यावर महिलांची धडक

By admin | Updated: July 14, 2016 02:15 IST

दारूबंदीसाठी कार्य करीत असलेल्या दारूबंदी माहिला मंडळाच्या महिलांवर अनेकदा प्राणघातक हल्ले होत असतात.

जनवादी महिला संघटना : दारूबंदी करणाऱ्या महिलांना सरंक्षण द्या खरांगणा (मो.) : दारूबंदीसाठी कार्य करीत असलेल्या दारूबंदी माहिला मंडळाच्या महिलांवर अनेकदा प्राणघातक हल्ले होत असतात. त्यामुळे दारूबंदीसाठी कार्य करीत असलेल्या महिलांना पोलीस संरक्षण अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महिलांनी केली. एवढेच नव्हे तर सदर मागणीसाठी खरांगणा पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चात जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष प्रभा घंगारे, प्रतिभा हाडके, दुर्गा काकडे, निर्मला वाघ, लंका धुर्वे, दीपमाला मालेकर, आदीसह संघटनेच्या इतरही महिला सहभागी झाल्या होत्या. खरांगणा येथील काळे महाराज देवस्थानापासून मोर्चाला सुरूवात झाली. सदर मोर्चा आठवडी बाजार, बसस्थानक मार्गे पोलीस ठाण्यात पोहचला. दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा या मागणीच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. पोलीस स्टेशन समोर द्वारसभाही घेण्यात आली. यात सीताराम लोहकरे, गणपत मेंढे, संजय भगत, चंद्रभान नाखले, दुर्गा काकडे यांनी भाषणे दिली. दारूविक्रेत्यांना सहा महिने जमानत देवू नये, दारूबंदीचे कार्य करणाऱ्या महिलांना शासकीय कायदे कमी पडत असल्याने आरोपी मोकाट फिरून नाहक त्रास देतात. गावात शांतता व सुव्यवस्था राहावी, अवैध धंदे बंद करावे, पोलीस पाटील, बीट जमादार, यांच्याकडून दारूविक्रेत्यांची यादी मागून कडक कारवाई करावी, माहिलआंना महिलांना संरक्षण द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. (वार्ताहर) कठोर कारवाई करण्याची गरज दारूविक्रेत्यांना अटक केल्यावर ते लगेचच जामीन घेऊन पुन्हा दारू विकण्यासाठी मोकळे होतात. या काळात अनेक दारूविक्रेते दारूबंदी महिला मंडळाच्या महिलांना धमकावतात. अनेक महिलांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले आहे. त्यामुळे अशा दारूविक्रेत्यांची लावकर जमानत न होऊ देता त्यांना कठोर शासन करणे गरजेचे आहे. तशी मागणी यावेळी करण्यात आली.