शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या शुल्क वाढीमुळे वीज ग्राहकांत संताप

By admin | Updated: June 10, 2015 02:15 IST

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीसह वीज वितरणने घरगुती ग्राहकांसह व्यापारी ग्राहकांना शुल्कवाढीचा शॉकच दिला आहे.

वर्धा : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीसह वीज वितरणने घरगुती ग्राहकांसह व्यापारी ग्राहकांना शुल्कवाढीचा शॉकच दिला आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या वीज शुल्कात एक टक्का वाढ करण्यात आली आहे. यामुळे बिलाच्या रकमेतही वाढ होणार आहे.पूर्वी विद्युत शुल्क १५ टक्के होते ते आता १६ टक्के करण्यात आले आहे. याचवेळी व्यापारी ग्राहकांचे वीजबिल चार टक्क्यांनी वाढणार आहे. घरगुती ग्राहकांना जर ५०० रुपये बिल द्यावे लागत असेल तर यानंतर ५०५ रुपये द्यावे लागेल. २००० रुपेय बिल येणाऱ्यांना २०२० रुपये तर एक हजार रुपये बिल देणाऱ्यांना यापूढे एक हजार १० रुपये बिल द्यावे लागणार आहे. अर्थसंकल्पातील करवाढीची अंमलबजावणी याच महिन्यापासून केली जाणार आहे. शिवाय राज्यात सात हजार ५०० सौर कृषिपंप बसविले जाणार आहे. या योजनेला निधी पुरविण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील वीजदरात एक टक्के वाढ केली जाणार आहे. ही वाढ प्रतियुनिट एक पैसा एवढी राहणार आहे. व्यापारी वीज ग्राहकांना चार टक्क्यांनी वीज वाढीला सामोरे जावे लागणार आहे. ही शुल्कवाढ आकस्मिक केल्याची चर्चा होती. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होतोय.(कार्यालय प्रतिनिधी)इमरजंसीच्या नावाखाली होतेय भारनियमन; शेतकरी त्रस्तसेलू : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना वीज वितरणच्या तुघलकी कारभाराचा फटका बसत आहे. वीज पुरवठ्यात आलेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. घोराड हे गाव पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येचे असून बागायती शेतीचे क्षेत्र आहे. या गावाला तीन लाईनमन वीज वितरणाचा कारभार पाहत होते. यापैकी एक सेवानिवृत्त झाले असून उर्वरित दोनपैकी एक आजारी असल्याच्या कारणाने दीर्घ रजेवर असल्याने एका लाईनमनच्या भरवशावर गाव व कृषी पंपाची जबाबदारी आली आहे. गत काही दिवसांपासून वारा, वादळामुळे कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत नसल्याने रोहिणी नक्षत्रात कपाशीची लागवड करणारे शेतकरी व केळी बागायतदारांपूढे नवीन संकट उभे ठाकले आहे. ओलिताचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. गावातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यास रात्र अंधारात काढावी लागते. शेतातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिवसागणिक प्रतीक्षा नित्याचीच झाली आहे. त्यातच घोराड कार्यालयाच्या अभियंत्यांची बदली नागपूरला झाल्याचे वृत्त आहे. यामुळे घोराड गावच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी एक लाईनमन कशी सांभाळणार, हा संशोधनाचा विषय ठरू पाहत आहे. इमरजंसीच्या नावावर भारनयिमन करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. यासाठी घोराड येथे लाईनमन देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांसह केळी उत्पादक व शेतकऱ्यांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)